एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला संपाचा इशारा
सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे अध्यक्ष मा. आमदार गोपीचंद पडळकर आणि मा. आमदार सदाभाऊ खोत एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागणीसाठी आक्रमक झाले असून राज्य सरकारला आषाढी एकादशी च्या दिवशी संपाचा इशारा दिला आहे.
विधान परिषदेचे सभापती मा. रामराजे निंबाळकर व सर्वपक्षीय आमदार यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत 18 पैकी 16 मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु आजतागायत त्या मागण्याची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी ????????सेवा शक्ती संघर्ष शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघा बरोबर शासनाच्या वतीने अनेक बैठका झाल्या आणि सरचिटणीस मा. सतीशदादा मेटकरी यांच्या माध्यमातून अनेक आंदोलणे झाली परंतु सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे आता ????????सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून थेट सरकारला संपाचा इशारा देण्यात आला आहे. जर सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आणि प्रलंबित 16 मागण्या ची अंमलबजावनी केली नाही तर येत्या 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रातील लाल परी एक दिवसासाठी थांबेल असा थेट इशारा देण्यात आला आहे.
………………………………………
प्रमुख मागण्या
……………………………………….
⭕ सातव्या आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी
⭕ एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व नोकरीची हमी राज्य शासनाने घ्यावी
⭕ आंदोलन काळातील पगार कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा.27आक्टोबर 2021 ते 22 एप्रिल 2022 पर्यंतचा आंदोलन काळ हा विशेष बाब म्हणून वार्षिक वेतन व उपदाणासाठी ग्राह्य धरण्यात यावा
⭕ शिस्त व आवेदन पद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात याव्या
⭕ मेडिक्लेम कॅशलेश योजना लागू करण्यात यावी (पोलीस खात्याच्या धरतीवर )
⭕ कोविड काळातील कोरोना भत्ता देण्यात यावा
⭕ वेतन वाढीचा दर सुधारण्यात यावा
⭕ गणवेश शिलाई भत्ता बाजार भावप्रमाणे देण्यात यावा
⭕ लिपिक पदासाठी 240 दिवसाची अट रद्द करण्यात यावी
⭕ 5150 इलेक्ट्रिक बसेस संदर्भात निर्णय घेतला आहे. परंतु सदर बसेस ह्या महामंडळाच्या स्वमालकीची देण्यात यावी
⭕ एस टी कामगार वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या पाल्याना सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय