‘ए मेरे हमसफर’ या सदाबहार मैफिलीत अजरामर गीतांनी रसिकश्रोते मंत्रमुग्ध …
नाशिकरोड :- ” रोते रोते हसना सीखो, क्या मौसम आया है , सुनयना सुनयना और मै तुम्हे देखते हुए देखू , दिवानी दिवाना तेरी बाहो मे , मेरे नैना सावनभादो , रिमझिम गिरे सावन, हमको हमिसे चुरालो, तेरी उम्मीद तेरा इंतजार, सुनो कहो कुछ हुआ क्या, आती रहेंगी बहारे, देखा हे पहिली बार साजन की, पतझड सावन बसंत बहार, मेरा चांद मुझे आया है नजर, वादा रहा सनम, आके ‘तेरी बाहो मे, सून बेलिया शुक्रिया मेहरबानी, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे , ” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर हिंदी गाणी रम्य सायंकाळी गायकांनी सादर करून रसिकांची मने जिंकली .
निमित्त होते ते ‘ आशा मेलोडी मेकर्स ‘ नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत ‘ ए मेरे हम सफर ‘ या हिंदी कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार गीतांचे गुरुवार दि.२२ जून २०२४ रोजी नाशिकरोड येथील माहेश्वरी भवन येथे आयोजन करण्यात आले होते . या गाण्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार यांनी केले . स्वतः गायक अमरकुमार यासह अविनाश देवरुखकर, एड. विनायक मेदगे,संजय परमसागर,गॉडविन लुईस, अर्चना सोनवणे,किरण गोसावी,नेहा आहेर , अनिल पांचाळ, अजय चव्हाण यांनी विविध गाजलेली सोलो, डुएट हिंदी गाणी सादर केली . याप्रसंगी सूर्यकांत आप्पा लवटे, रमेश धोंगडे, कोमल मेहरोलीया, शिवाजी हांडोरे, तानाजी कोठुळे, संदीप उदावंत, सोनकांबळे सर, रवि चंद्रे, श्याम खोले, सुधाकर जाधव, प्रकाश लोंढे, बाळासाहेब गायधनी, राजन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.ध्वनी व्यवस्था कैलास काळे यांनी तर सूत्रसंचालन संतोष फासाटे यांनी केले . गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उस्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला .