आरोग्य व शिक्षणनिवडब्रेकिंगसत्कारसामाजिक
सौ.उमा अर्जुन चव्हाण यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान

0
2
5
5
5
9
सौ.उमा अर्जुन चव्हाण यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान
वनसगाव – रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका सौ.उमा अर्जुन चव्हाण यांना यावर्षीचा कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक पुरस्कार मा. खासदार श्री. भास्करराव भगरे (सर )व मा. आमदार श्री. सत्यजित तांबे यांचे शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मापत्र देऊन मोठया उत्साहात शिरवाडे वणी(कुसुमाग्रज नगरी )येथे गुरवार दि.27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपन्न झाला. याबद्दल सौ. उमा चव्हाण यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. भागीरथ काका शिंदे, जनरल बॉडी सदस्य मा. श्री.डॉ.सुजित गुंजाळ, संस्थेचे लाईफ मेंबर श्री.चांदे सर, विंचूरचे गटप्रमुख प्राचार्य नंदकुमार देवढे, वनसगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. धनंजय डुंबरे, व्यवस्थापक मा. श्री. एकनाथ शिंदे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुनील शिंदे व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मा. श्री. योगेश डुंबरे, प्राचार्य मा. श्री. रोटे सी.डी. पर्यवेक्षक मा.श्री.अर्जुन चव्हाण व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.सुरेश सलादे, उपाध्यक्ष विजय पवार, प्राचार्य डॉ. शिवाजी जाधव, सतीश गोसावी, प्राचार्य डॉ. महेश वाघ, संघाचे विश्वस्त प्रा.डॉ.समाधान गांगुर्डे, प्रा. दिनकर रसाळ, प्रा. डॉ. जयश्री पवार, प्रा. मृणाल वैद्य प्रा.ज्ञानेश्वर कावळे, नातेवाईक. मित्र इ. सर्व कार्यक्रमास उपस्थित होते.
0
2
5
5
5
9