0
1
5
1
2
1
पिकअप सह दोघांना अटक
भाऊसाहेब हुजबंद…
महिंद्रा कंपनीच्या पिकअप मध्ये गोवंश जातीची सुमारे सात जनावरे कत्तलीसाठी वाहून नेत असताना विंचूर येथील हॉटेल आनंद पॅलेस समोरील हायवेवर लासलगाव पोलिसांनी पकडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडी क्रमांक एम एच 15 ई जी 29 77 मध्ये गोवंश जातीचे सात जनावरे खचून भरून कत्तलखान्यात नेत असल्याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळाली. या माहितीवरून लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हॉटेल आनंद पॅलेस समोर गेले असता त्यांना वरील वाहनात जनावरे कोंबल्याचे आढळून आले. त्यांनी गाडी अडवून तपासणी केली असता सदरची जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे समजले यावरून संशयित आरोपी गजानन रमेश उपेवाड ( वय 28 रा. देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर ) व इरफान गफूर शेख उर्फ इरफान काल्या (रा उंबरठाण तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक ) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत सात गोवंश जातीची जनावरे, महिंद्रा कंपनीचे पिकअप गाडी असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल सागर आरोटे यांच्या फिर्यादीवरून संशयीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घुमरे, पोलीस कॉन्स्टेबल सागर आरोटे व त्यांचे सहकारी कर्मचारी करीत आहेत.
0
1
5
1
2
1