Breaking
महाराष्ट्र

लालपरी आता नव्या रुपात आणि आकर्षक ढंगात

पहिली झलक पाहून होईल प्रवास करण्याचा मोह

0 1 5 1 2 2

किरण घायदार…

राज्यातील सर्वसामान्य लोकांचा आधार असलेली व गावागावातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या नवीन लूकमध्ये दिसणार आहे. एसटी महामंडळाच्या बसेस आता लवकरच नव्या व आकर्षक लुकमध्ये दिसणार आहेत. या बसची पहिली झलक समोर आली आहे. लवकरच ही नव्या रुपातील एसटी बसेस रस्त्यावर धावणार आहे.

नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने २ हजार २५० गाड्या दाखल होणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात ३०० बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकारक होणार आहे.

२२५० बसेससाठी राज्य सरकार १०१२ कोटी रूपये खर्च करणार आहे. अशोक लेलँड कंपनीच्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती. मात्र आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटीच्या ताफ्यात नवीन बसचा समावेश नोव्हेंबर महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या बस टु बाय टू आसनी असून एका बसचा अंदाजित खर्च ३८.२६ लाख रुपये असणार आहे. या बस आधुनिक असणार आहेत. या बसची बॉडी AIS १५३ असणार असून या BS VI स्टॅंडर्डच्या असणार आहेत. या बसला१९७एचपी – एच सिरिजचे इंजिन आहे. या बस रिअर एअर सस्पेन्शनसह अन्य सुविधा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत.

कोरोना महामारी व एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. मे २०२२ पासून एसटी पुन्हा रस्त्यावर उतरली मात्र घटत्या प्रवासी संख्येचे मोठे आव्हान होते. एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत ७५वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत देण्याची योजना सुरू केली.
एसटी महामंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत देण्याची योजना सुरू केली.

सरकारच्या योजनेमुळे दुरावलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळले. सध्या ५३ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत. जुलै महिन्यात महामंडळाच्या 31विभाग प्रथमच नफ्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या महिन्यात एसटी महामंडळाला 22 कोटीचा तोटा झालेला आहे. एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत एसटी चा तोटा १३१ कोटींनी कमी झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे