Breaking
महाराष्ट्र

*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद*

0 1 5 1 2 2

*_प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद*_

*आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना*

*जळगाव,दि.२५ ऑगस्ट (जिमाका) -* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा ८० लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदी, ड्रोन दीदी, पशु दिदी, कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००००

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे