Breaking
महाराष्ट्रसत्कार

व्हिजन मनी मंत्रातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार

0 3 2 1 2 3

कर्तबगार महिलांचा सत्कार, अमोल पराडकर यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल येथोचित सत्कार समारंभ संपन्न

नांदगाव, प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):-

आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्ताने व्हिजन मनी मंत्रातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सत्कार रोटरी सभागृह कोल्हापूर येथे सौ. अरुंधती महाडिक वहिनी साहेब व प्रसिद्ध मालसोपचार तज्ञ डॉक्टर कविता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

भगीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक वहिनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, महिलांनी ताण तणाव विरहित जीवन जगायला हवी. तरच त्या कुटुंबातील सदस्यांची सर्व प्रकारे काळजी घेतील व विजन मनी मंत्राच्या मदतीने आर्थिक नियोजन करतील. आर्थिक साक्षरता येण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी विजन मणी मंत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे असेही त्या म्हणाल्या.

अमित शहा, दर्शना शहा, रवींद्र शिंदे यांच्या वतीने ही कंपनी चालवली जाते. या कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रम झाला. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता यावी आणि गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी यासाठी अमित शहा यांची व्याख्यान झाले. सी‌.ए. अमित शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केले. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे साहित्यिक व सामाजिक स्तरावरून कौतुक होत आहे.

सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे