Breaking
गुन्हेगारी

लासलगावी वाढदिवसाला केक कापण्यासाठी केला तलवारीचा वापर 

शस्त्रसाठ्यासह तिघे जेरबंद

0 1 5 1 2 1

लासलगावी वाढदिवसाला केक कापण्यासाठी केला तलवारीचा वापर

लासलगांव पोलीसांच्या कार्यवाहीत तलवारीसह हत्यारे सापडून तिघे जेरंबद

शरद लोहकरे, लासलगाव…

लासलगाव येथे वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी तलवार काढणे भलतेच महाग पडले असून याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. घरझडतीत हत्यारे आढळून आल्याने आरोपींच्या विरोधात आर्म्स अॅक्टसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर सर, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व निलेश पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध कृत्याविरोधात केलेली भुमिका लक्षात घेवुन लासलगांव पोलीस ठाणे हद्दीत लासलगांव या ठिकाणी दि.५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेचे सुमारास आरोपी अमीर युनुस पठाण याचे वाढदिवसानिमित्त अदनान युनुस पठाण व अरबाज युनुस पठाण तसेच इतर असे केक कापण्यासाठी आलेले होते. आरोपी अदनान युनुस पठाण याने त्याचे घरुन केक कापण्यासाठी तलवार आणली व तिने केक कापण्याचा प्रयत्न केला. या बाबत लासलगाव पोलिसांना गोपनीय माहीती मिळाल्याने सदर घटनेचे फोटो लासलगांव पोलीस ठाणेकडील पो.ना. गोसावी पो.कॉ सुजय बारगळ, पो.कॉ अमोल तळेकर यांनी प्राप्त करत पो.उ.नि आप्पासाहेब हांडाळ यांचे समवेत पो.ना.गोसावी, पो.कॉ.बारगळ, पो.कॉ.डगळे, पो.कॉ तळेकर, म.पो.ना कदम यांच्या पोलीस पथकाने अदनान पठाण याचे घर गाठले. घराची झडती घेतली असता त्याचे घरातुन तलवार, कुकरी, चॉपर, चाकु, हॉकी स्टीक असे हत्यार जप्त केले. याप्रकरणी अदनान युनुस पठाण वय २९, अमिर युनिस पठाण वय २७, अजय सत्तर राजपुत वय २५ रा.लासलगाव यांचे विरुद्द पो.ना.गोसावी यांचे फिर्यादीवरुन लासलगांव पोलीस ठाणेस गु.र.न. १९०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ४/२५, ५/२५ भारतीय न्यायसंहीता कायदा २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि आप्पासाहेब हांडाळ अधिक तपास करीत आहेत.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे