ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
भुसावळ परिसरात तेजोदीप फाऊंडेशनतर्फे जनजागृती

0
3
2
1
2
3
भुसावळ परिसरात तेजोदीप फाऊंडेशनतर्फे जनजागृती
भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ शहरातील पी . ओ .नहाटा महाविद्यालयात प्राचार्य व प्रशासनास भेटून आगामी ११ व १२ एप्रिल २०२५ रोजीच्या नोकरी मेळावा व भव्य उद्योग, व्यवसाय करीयर मार्गदर्शन कार्यक्रमाचे माहितीपत्रक देऊन कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी संवाद साधण्यात येत आहे. शहर परिसरात तेजोदीप टीमतर्फे ठिकठिकाणी माहितीपत्रक विद्याथ्यार्ंना प्रत्यक्ष भेटून वितरीत करण्यावर भर देण्यात येत आहे.
याप्रसंगी शहरातील कैलास ढाके, मधुकर रोटे, किरण पाटील, योगेश कोलते व मित्रमंडळ उपस्थित होते. याप्रसंगी भुसावळ येथील जामनेर रोडवरील नहाटा महाविद्यालयात प्रभारी, उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद व विद्यार्र्थी, यांना प्रत्यक्ष भेटून व संवाद साधून मेळावा कार्यक्रमाविषयी माहिती िदली. यावेळी नहाटा महाविद्यालय प्रशासनानतर्फे पत्रके जास्तीत जास्त विद्याथ्यार्ंंना महाविद्यालयाच्या सोशल मीडीया ग्रृपवर वितरीत करण्यात येणार असून, नहाटा महाविद्यालय संबंधित सर्व ग्रुपवर कार्यक्रम जनजागृती माहिी पत्रक शेअर करणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच भुसावळ तालुक्यातील साकेगाव बस थांब्यावर ग्रामस्थांना मेळाव्याचे माहितीपत्रके तेजोदीप टीमतर्फे जनजागृतीसाठी देण्यात आले. आगामी कार्यक्रमाची माहिती व जनजागृतीचे नियोजन तेजोदीपचे अध्यक्ष राजेश नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत वाकचौरे, प्रा. धिरज पाटील, रवींद्र जाधव, मुरलीधर खर्चे, भूषण पाटील, शशिकांत फेगडे, विनायक बेंडाळे, योगेश कोलते, सुरेश लोखंडे, किरण पाटील, संदीप राणे, दर्शन नेहेते, मनोज नाले, निलेश बाक्षे, गणेश नाफडे, गुणवंत भारंबे, पिंटू धांडे, मनोज वराडे, गजानन किनगे, नरेंद्न जंगले, निलेश खर्चे, सरीता नेहेते, लीना लोखंडे, लता जंगले, रुपाली नारखेडे, शोभा नाफडे व मित्र परिवारसह संस्था सदस्य, सहयोगी सदस्य मेहनत घेत आहे.
0
3
2
1
2
3