Breaking
ब्रेकिंग

विंचूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेबाबत प्रशासनाने दिला.. हा निर्णय

ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश

0 4 2 9 3 8

विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गट नं. ६२७) संदर्भात उद्भवलेल्या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित महसूल व सीटीएस नोंदींची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे. शाळेच्या जमिनीबाबत कोणतीही बेकायदेशीर अथवा चुकीची नोंद होऊ दिली जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी मांडली.

        ता.११ फेब्रुवारी रोजी सचिन रत्नाकर दरेकर, सरपंच, ग्रामपंचायत विंचूर यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार गट नं. ६२७ मधील शाळेची जमीन चुकीच्या जनरल मुखत्यारपत्राच्या आधारे खरेदी करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शाळेची जमीन ही गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काशी व भविष्याशी निगडीत संवेदनशील विषय असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

       याअनुषंगाने उपअधीक्षक. भूमी अभिलेख यांच्याकडून सीटीएस नोंदींबाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला. प्राप्त अहवालानुसार मूळ सर्वे नं. ६८२ हा गटस्कीमनंतर गट नं. १८२६ झाला असून पुढे विंचूर गाव विभाजनानंतर गट नं. ६२७ असा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे संबंधित गटाचे एकूण क्षेत्र ०.५४ आर आहे.

जुना सर्वे नं. ६८२ मधील सिटी सर्वे नं. १२३२, १२३३ व १२३४ या मिळकती सन १९७३ पासून जिल्हा परिषद, नाशिक यांच्या नावे चौकशी नोंदवहीत नमूद आहेत. त्यानुसार संबंधित मालमत्ता पत्रके जिल्हा परिषद. नाशिक व मराठी शाळा. जिल्हा परिषद नाशिक यांच्या नावाने तयार आहेत. तथापि. उर्वरित खुल्या जागेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार न झाल्यामुळे संपुर्ण गटाचे मिळकत पत्रीका तयार झाल्याशिवाय महसूल विभागाकडील ७/१२ उतारा बंद करण्यात येत नाही या प्रक्रियात्मक त्रुटीचा गैरफायदा घेत गटातील ०.१०.५० आर क्षेत्राची खरेदी झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे.

        शासनाच्या प्रचलित नियमांनुसार खुल्या जागेचा स्वतंत्र सीटीएस क्रमांक निश्चित झाल्यानंतर एकूण क्षेत्राचा मेळ घेऊन महसूल विभागाकडील ७/१२ बंद करण्याची कायदेशीर कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे. दरम्यान, सदर मिळकतीबाबत कोणतीही फेरफार नोंद अथवा हस्तांतरण होऊ नये यासाठी संबंधित तलाठी यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले असून. चौकशी नोंदींनुसार जिल्हा परिषद शाळेची नोंद कायम ठेवण्यात येणार आहे.

शिक्षण संस्थांशी संबंधित जमीनप्रकरणात प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही. कायद्यानुसार दोष आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. असा ठाम इशाराही तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे