0
3
2
1
2
3
निफाड (प्रतिनिधी)
व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने निफाड तालुक्यातील पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकारांच्या पाल्यांना (मुलांना) शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलग होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सायखेडा पोलीस ठाण्याचे स.पो.निरी.विलास ढोकरे निफाड पोलीस ठाण्याचे स.पो.निरी. ईश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देविदास बैरागी, सुधिर उमराळकर, देवानंद बैरागी, इमरान शेख, योगेश कर्डीले, राजेश भडांगे, मायकल खरात आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुमार कडलग यांनी व्हॉईस ऑफ मिडिया ही पत्रकारांची संघटना ४१ देशांमध्ये काम करत असून दि.४ जुलै रोजी पत्रकारांच्या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी धरणे आंदोलने करण्यात आले होते. याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला बोलणी करण्यासाठी बोलावले आहे.बोलणी मध्ये पत्रकारांच्या समस्यांवर काही ना काही तोडगा निघेल असे सांगितले.
कार्याध्यक्ष मच्छिंद्र साळुंखे, सरचिटणीस रोहन सरोदे, सचिव बाबा गिते, सहसचिव राहुल कुलकर्णी, संपर्क प्रमुख सुनील क्षीरसागर, प्रसिद्ध प्रमुख जनार्दन चव्हाण आदींनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कुमार कडलग यांनी भूषविले तर सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक विलास ढोकरे, निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हारून शेख, बाळासाहेब वाघ, उत्कृष्ट पत्रकार दीपक घायाळ, आसिफ पठाण, माणिक देसाई, राजेंद्र पवार, किरणकुमार आवारे, बाजीराव कमानकर, दीपक श्रीवस्तव यांचे शाल, ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डी.बी. कादरी, हारुण शेख, सपोनि विलास ढोकरे, देविदास बैरागी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहास सुरळीकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन देविदास बैरागी यांनी केले.
0
3
2
1
2
3