क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक
‘झापुक झुपुक’ सिनेमा २५ एप्रिलपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये! अॅडव्हान्स बुकिंग सुरू !

0
3
2
1
2
1
जसं नाव तसंच काम, “झापुक झुपुक” म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट! केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपुक’ सिनेमा २५ एप्रिलपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये! अॅडव्हान्स बुकिंग सुरू !
मराठी चित्रपटसृष्टीत हास्य आणि प्रेमाची नवी लाट घेऊन येणारा बहुप्रतिक्षित “झापुक झुपूक” या चित्रपटाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता ती प्रतीक्षा संपली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘झापुक झुपुक’ हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट प्रेम, मैत्री आणि हास्याने भरलेला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर ला आणि गाण्यांना आता पर्यंत प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यात काही शंका नाही कि चित्रपटाला सुद्धा तितकच प्रेम प्रेक्षक देतील. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख यांनी सुद्धा ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तिकीट लवकरात लवकर बुक करा आणि ‘झापुक झुपूक’ चा आनंद घ्या!
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित “झापुक झुपूक” या चित्रपटामध्ये सूरज चव्हाणच्या अभिनयाची झलक पाहण्यासाठी आणि केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक सज्ज आहेत. ‘झापुक झुपूक’ हे नाव जितकं गमतीशीर आहे, तितकाच हा चित्रपट प्रेक्षकांना हसवणार, गुंतवणार आणि शेवटी एक उबदार संदेश देऊन जाईल.
त्यामुळे धमाल, दंगा आणि मनोरंजनाचा फुल्ल डोस अनुभवायला २५ एप्रिलला नजीकच्या चित्रपटगृहात नक्की भेट द्या.
0
3
2
1
2
1