Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

” जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत उत्तुंग यश “

0 3 2 1 2 3

सटाणा: मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , सटाणा येथील विद्यार्थिनींनी भारत सरकारद्वारे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाले आहे.

यशस्वी विद्यार्थिनींमध्ये
– कु. अहिरे सृष्टी विजय – 86 गुण
– कु. दशपुते मोक्षदा तुषार – 82 गुण
– कु. जाधव हर्षदा मनोज – 78 गुण
– कु. धिवरे श्रेया देवानंद – 65 गुण यांचा समावेश आहे ..
या विद्यार्थिनी सदर परीक्षेसाठी पात्र ठरल्या असून त्यांना भारत सरकारकडून वार्षिक 12000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून, यामुळे त्यांच्या शिक्षणाला आर्थिक मदत मिळेल.

या गौरवशाली यशाच्या निमित्ताने विद्यालयात विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता सोनवणे यांनी भूषवले, तर उपमुख्याध्यापिका श्रीमती. देवरे जे. बी. यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिका यांनी विद्यार्थिनींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले.

या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुण प्राप्त केले.यशस्वी विद्यार्थिनींना विद्यालयाचे उपशिक्षक,
श्री. एस. के. वाघ,
श्रीमती.एस. डी. पगार,
श्रीमती.व्ही. एच. पवार यांचे मार्गदर्शन लाभले ..
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक बी. के. ढेपले, डी.डी.पवार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, सर्व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सौ.संगिता सोनवणे यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत, भविष्यातही अधिक मेहनत घेण्याचा संदेश दिला. त्यांनी शिक्षण हेच जीवनातील यशाचे मूलभूत आधार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे