आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
सिद्धीविनायक बी.एड. महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टीकोन,प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

0
2
5
6
6
2
सिद्धीविनायक बी.एड. महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टीकोन,प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
नांदगाव:( प्रतिनिधी ) .नांदगांव येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या श्री. सिद्धीविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ” वैज्ञानिक दृष्टीकोन , प्रात्यक्षिक सादरीकरण व प्रशिक्षण ” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. श्री ठकसेन गोराणे सर प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री .विक्रम घुगे हे होते. तसेच ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सरचिटणीस मा.रमेश अप्पासाहेब पगार यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ. गोराणे सर यांनी चमत्कारावर आधारित अनेक प्रात्यक्षिके व प्रयोग सादर करून, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व विद्यार्थी शिक्षकांना पटवून दिले. त्यांनी विवेकी विचार आणि सामाजिक स्वास्थ्य यांचा संबंध व गरज विविध संदर्भाद्वारे प्रतिपादित केली. भगिनाथ जेजुरकर, ज्येष्ठ पत्रकार मारूतीराव जगधने यांनी अंधश्रद्धेचे अनेक उदाहरणे देऊन प्रबोधन केले. विद्यार्थी शिक्षकांनी उपस्थिती केलेले प्रश्न वजा शंकांचे डॉ. गोराणे सरांनी अचूक उत्तरे देऊन समाधान केले व भावी पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यात शिक्षकाची भूमिका कथन केली. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात अंधश्रद्धा,बुवाबाजीचे परिणामांचा घातक परिणाम विषद केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्रा. मीरा कांबळे व प्रा. पूजा गवळी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. रविंद्र सुरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. इप्पर सर व प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय प्रा. पवार सर यांनी करून दिला.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस मा. अप्पासाहेब पगार, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. ठकसेन गोराणे सर, प्रा सुरेश नारायणे सर,मारुतीराव जगधने, भागिनाथ जेजुरकर, भूषण गरुड, चव्हाण सर, महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा.विक्रम घुगे, प्रा. रविंद्र सुरसे, प्रा. किरण पवार, प्रा. अनिल इप्पर, प्रा. मीरा कांबळे,प्रा. पुजा गवळी, प्रा. निकिता घोडके, प्रा. दिव्यानी देहाडराय, प्रा.वंदना राठोड , श्री किरण बोरसे, श्री. शुभम पवार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक /शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0
2
5
6
6
2