आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
बिटको महाविद्यालयात पाच दिवसीय मोबाईल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट वर कार्यशाळा संपन्न

0
2
5
6
5
9
बिटको महाविद्यालयात पाच दिवसीय मोबाईल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंट वर कार्यशाळा संपन्न…
नाशिकरोड : ” मोबाईल ॲप्लिकेशन्सचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोन किंवा इतर माध्यमातून थेट विशिष्ट सेवा माहिती आणि कार्यक्षमतेमध्ये जलद सोयीस्कर रित्या उपयोग होत असतो . विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आज जगात खूप मोठे क्रांतिकारी बदल झाले आहेत . दैनंदिन जीवनात आपण विविध ॲप्सचा उपयोग आपण मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करत असतो. यात रोजच नवीन नवीन बदल सातत्याने होत असतात. ए. आय., चॅट जीपीटी असे अनेक अद्ययावत तंत्रज्ञान याचा वापर होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात अशा स्किल बेस, संशोधन उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले आहे, “असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात पाच दिवसीय ३० तासांचा मोबाईल ॲप्लिकेशन्स डेव्हलपमेंटवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी समारोप सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेत वेस्टोगो इनोव्हेशन्स,नाशिक येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर आशिष म्हालणकर यांनी मोबाईल ॲप्लिकेशन्स विथ फ्लटर व त्याचा वापर याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात, ” ‘ फ्लटर ‘ हे गुगल द्वारे विकसित केलेले एक मुक्तस्रोत फ्रेमवर्क असून त्याच्या पद्धतीने एकाच कोडबेस वरून अनेक फ्लॅटफॉर्मसाठी एप्लीकेशनचा वापरकर्ता इंटरफेस तयार करता येतो तसेच मोबाईल डेस्कटॉप आणि वेब प्लॅटफॉर्मवर या एप्लीकेशनचा वापर करता येतो, ” असे सांगितले.
याप्रसंगी संयोजिका व संगणक विभागप्रमुख प्रा. सौ. ए. एम. शेख, समन्वयक सौ. एल. एच. किनगे, प्रा. एस. एस. महाले यासह सदस्य कल्पेश चव्हाण, तेजल चव्हाण, सौ. जोशी मॅडम आदी मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी बावधनकर यांनी केले तर आभार सौ. वाय. एच. सोनवणे यांनी मानले. या कार्यशाळेचा लाभ टीवाय बीएससी व एमएससी कॉम्प्युटर सायन्स यासह टीवाय बीसीए, टीवाय बीएससी मॅथ्स अशा एकूण १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ घेतला .
द्वारा – श्री. संजय परमसागर, नाशिकरोड
0
2
5
6
5
9