Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रशासकीय

निफाड येथे महसूल सप्ताहाचा आरंभ

0 4 2 9 5 7

निफाड येथे महसूल सप्ताहाचा आरंभ आरोग्य तपासणी शिबिराने

निफाड सागर निकाळे….

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, महसूल सप्ताहाच्या औपचारिक उद्घाटनाचा प्रारंभ दि १ ऑगस्ट, शुक्रवार रोजी आरोग्य तपासणी शिबिराने करण्यात आला. निफाड येथील तहसील कार्यालयात झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे प्रमुख उपस्थित होते.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही महसूल सप्ताहात जनतेशी थेट संपर्क साधणारे व प्रशासन-जनतेत संवाद वाढवणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.याची सुरुवात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीने झाली असून,यात रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, नेत्रतपासणी आदी चाचण्या करण्यात आल्या. या उपक्रमास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे म्हणाले,”महसूल प्रशासन हा जनतेच्या अडचणींवर तत्काळ कृती करणारा विभाग आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहणे ही विभागासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे.”

तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले की,महसूल सप्ताहात शालेय जनजागृती कार्यक्रम,सेवा सोयींचे वितरण, माहिती अभियान, ई-सेवांबाबत जनजागृती,वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण संवाद,अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाची मदत घेण्यात आली होती.या सकारात्मक सुरुवातीने महसूल सप्ताहाचे स्वरूप अधिक लोकाभिमुख ठरणार आहे.

महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत महसूल सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. या उपक्रमांमुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष व्यक्तींना थेट लाभ होणार आहे.

या प्रसंगी डॉ शशिकांत मंगरुळे (उपविभागीय अधिकारी निफाड),विशाल नाईकवाडे (तहसीलदार निफाड),बाबासाहेब खेडकर (प्रशासन नायब तहसीलदार),राजेंद्र वराडे (निवडणूक नायब तहसीलदार), सविता पठारे (सँगायो नायब तहसीलदार) सुनील गांगुर्डे ( नायब तहसीलदार) दिपाली जगताप ( दुय्यम निबंधक निफाड) प्रमोद जाधव ( उपकोषागार अधिकारी) आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमात निफाड मंडळ अधिकारी प्रशांत तांबे यांचे नायब तहसीलदार पदी पदोन्नती झाले बद्दल सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे