विंचूर येथे संत नामदेव महाराजांची जयंती उत्साहात साजरी..
विंचूर येथे संत नामदेव महाराजांची जयंती उत्साहात साजरी..
विंचूर : श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची ७५४ वी जयंती विंचूर येथील संत नामदेव महाराज मंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
या दिवशी सकाळी ६:०० वा. संत नामदेव महाराजांच्या मूर्तीवर शोडशोपचारे महाअभिषेक शिंपी समाजाचे अध्यक्ष किरण नवले यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. नंतर काकडा- आरती, भजन व अल्पोहार म्हणून उपस्थित भाविकांना फराळाचे पदार्थ देण्यात आले.
संत नामदेव हे १३ व्या शतकातील भारतीय संत, कवी आणि समाजसुधारक होते. ज्यांनी मराठी साहित्य आणि भक्ती चळवळीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नामदेव जयंती हा उत्सव साजरा करणे म्हणजे त्याच्या जीवन, शिकवणी आणि वारसा यांचा उत्सव आहे. हे त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी भारतातील शिंपी समाज बांधव मोठ्या आदराने साजरा करत असतात. विशेषत: महाराष्ट्रात या दिवशी, भक्त आणि अनुयायी संत नामदेव यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांच्या आठवणी करून घेतात, त्यांच्या कविता आणि भजनांचे पठण करतात आणि त्यांच्या शिकवणींचा विचार करतात. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि संगीत कार्यक्रम आयोजित केले जातात. नामदेव जयंती हा सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्मिक मूल्यांचा उत्सव आहे. जो लोकांना त्यांच्या जीवनात जातिभेद आणि भेदभाव न करता सर्वांशी एकता आणि करुणेने वागण्याची शिकवण देतो.
यावेळी मंदिरात शिंपी समाजाचे देविदास कल्याणकर, ज्ञानदेव कल्याणकर, कृष्णा कल्याणकर, गोविंद कल्याणकर, सोमनाथ कल्याणकर, संतोष पांडुरंग कल्याणकर, मास्टर खैरनार, महाजन सर, भगवान बकरे, किरण नवले, विजय क्षीरसागर, अरुण कल्याणकर, सतीश कल्याणकर, सुनील क्षिरसागर, योगेश खर्डे, संजय बोढाई, दत्तात्रय करमासे, मंगेश करमासे, रत्नाकर क्षिरसागर, कैलास कल्याणकर, दत्तात्रय कल्याणकर, पुरुषोत्तम कल्याणकर, भजन करी आणि महिला भगिनी आदी भाविक उपस्थित होते.