ठोकळवाडी (सुभाष नगर) येथून युवक बेपत्ता
विंचूर/प्रतिनिधी-
येथून जवळच असलेल्या ठोकळवाडी येथील 25 वर्षीय युवक दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी बारा वाजेपासून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार ज्योत्स्ना संजय खोमणे (वय 50) यांनी लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर संजय खोमणे (वय वर्ष 25) मजुरी करणारा हा युवक ठोकळवाडी ( सुभाष नगर ) ता. निफाड, जि. नाशिक दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता सांगून गेला की माझे सासरी पत्नीकडे करांजा वाशिम मुंबई येथे जात आहे. सायंकाळी आठ वाजता त्याची पत्नी आश्विनी हिने फोन करून ते (सागर) मुंबई येथे आले नसल्याचे कळविले. त्यानंतर सदर युवकाचा शोध लासलगाव, निफाड, येवला, सिन्नर, नाशिक येथे तसेच नातेवाईक यांच्याकडे घेतला. परंतु अद्यापपर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे सागरची आई ज्योत्स्ना संजय खोमणे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. यावरून लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग नंबर ५४/२०२४ यानुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. एस. घुमरे करीत आहेत.
बेपत्ता युवकाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.
शरीराने सडपातळ, उंची १७० सेंटिमीटर (5 फूट 6 इंच), रंगाने सावळा, चेहरा उभा, नाक सरळ, डोक्याचे केस बारीक, अंगात रेघाळी काळ्या रंगाचे शर्ट, जांभळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात पांढऱ्या रंगाची बुट