Breaking
ब्रेकिंग

प्रवासी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

0 4 2 9 5 7

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरु होणार आहे.

कोणाला मिळणार NCMC कार्ड?

या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे:

  • विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
  • ज्येष्ठ नागरिक व महिला: अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
  • दिव्यांग प्रवासी: UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड.
  • पुस्कारार्थी व पत्रकार: स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारा मार्फत वितरण.

NCMC कार्डची वैशिष्ट्ये – प्रवासात स्मार्ट सोय

  1. किंमत: नवीन कार्ड 199/- रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149/- रुपयांत उपलब्ध.
  2. वॉलेट मर्यादा: किमान 100/- रुपये; 50/- रुपयांच्या पटीत रिचार्ज.
  3. रिचार्ज सुविधा: ईटीएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
  4. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000 हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.
  5. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

NCMC Card चे फायदे:

  • कॅशलेस प्रवास: सुट्या पैशांची आता गरज नाही. कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त NCMC कार्ड चा वापर करून तिकीट काढता येते.
  • विविध उपयोग: NCMC कार्ड तुम्ही मुंबई, पुणे आणि इतर शहरांतील शहरातील मेट्रो, बस, रेल्वे प्रवासासाठी वापरू शकता.
  • वेळेची बचत: तासनतास रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
  • सुरक्षितता: तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची गरज भासत नाही.
  • सरकार कडून सवलती: अनेकदा डिजिटल पेमेंटवर महामंडळाकडून काही विशेष सवलती मिळण्याची शक्यता असते.

नोंदणी आणि वितरण:

सवलतीचा प्रकार बस डेपो / नियंत्रण केंद्र अधिकृत एजंट आवश्यक कागदपत्र
महिला आधार कार्ड
ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड
अमृत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड
दृष्टिहीन वैश्विक ओळखपत्र
दिव्यांग (शारीरिक अपंग) वैश्विक ओळखपत्र
विद्यार्थी x सरल क्रमांक
इतर सर्व सवलती x शासकीय प्रमाण पत्र
सवलत नसलेले प्रवासी मोबाईल OTP

सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य राहील.

NCMC कार्ड मिळवण्याची पद्धत:

  • एसटी बस स्थानक: तुमच्या जवळच्या प्रमुख एसटी बस स्थानकात जाऊन तुम्ही या कार्डासाठी अर्ज करू शकता.
  • कागदपत्रे: NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.
  • नोंदणी शुल्क: कार्ड साठी प्रवाशांना 199/- शुल्क देणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तुमचे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149/- रुपये देणे आवश्यक राहील.

NCMC कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत:

  • तुमच्या नजीकच्या एसटी बस स्थानक खिडकीवर जाऊन.
  • ऑनलाईन बँकिंग, UPI (Google Pay, PhonePe) किंवा मोबाईल ॲपद्वारे.
  • बस कंडक्टरकडे असलेल्या ई-तिकीट मशीनद्वारे देखील तुमचे NCMC कार्ड रिचार्ज करू शकता.

प्रवाशांना उपयुक्त माहिती:

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे