ब्रेकिंग
शिवसेना महिला आघाडीने केले फराळ व रुद्राक्ष वाटप

0
2
5
5
5
9
नांदगाव शहरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीने फराळ व रुद्राक्ष वाटप केले
नांदगाव, दि.26 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव शहरातील कैलास नगर येथील शिवशक्ती महादेव मंदिर, येवला रोड, रेल्वे चाळ येथील जयसिंग भोले मंदिर, नवी वस्ती येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने समाजसेविका सौ. अंजुमताई सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने फराळ व रुद्राक्ष वाटप करण्यात आले.
याप्रसंगी एडवोकेट विद्याताई कसबे, हेमा राठोड, नेहा कोळगे, उषा राठोड, जयाताई जगताप, विजया चतुर, माया अहिरे, वंदना पांडे, आशाताई पाटील, सुमनताई चव्हाण, मीराताई सरग, उषा शिंदे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या उपक्रमाला उपनगर, अहिल्याबाई होळकर नगर, नवी वस्ती येथील नागरिकांकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
0
2
5
5
5
9