बिग बी उद्गारले, “भारताचे भविष्य चांगल्या हातांमध्ये आहे”
अंतराळाचे आकर्षण असलेल्या 15-वर्षीय आर्यन हांडाचे कौतुक करताना बिग बी उद्गारले, “भारताचे भविष्य चांगल्या हातांमध्ये आहे”
~ कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये आर्यन हांडा 1 करोडच्या प्रश्नापर्यंत पोहोचणारा पहिला ज्युनियर ठरल!~
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 च्या ज्युनियर्स वीक मध्ये भटिंडा, पंजाबहून आलेला 15-वर्षीय आर्यन हांडा आपली हुशारी, जिज्ञासा आणि दृढता दाखवून देशाचे मन जिंकून घेताना दिसेल. दहावीत शिकत असलेला आर्यन या सीझनमध्ये 50 लाख पॉइंट जिंकणारा पहिला ज्युनियर स्पर्धक तर बनेलच, शिवाय तो 1 करोडच्या प्रश्नाला देखील सामोरा जाताना दिसेल. सर्वश्रेष्ठ बक्षीस जिंकण्याचा त्याचा निर्णय खरोखर प्रेरणादायक आहे.
अंतराळ आणि विज्ञानाविषयीचे आर्यनचे वेड असामान्य आहे. गेल्या वर्षी चंद्रयान-3 ज्यावेळी लॉन्च झाले, तेव्हापासून त्याला अंतरिक्षाने आकर्षित केले. आर्यन सांगतो, “जेव्हा चंद्रयान-3 ची बातमी आली, तेव्हा अंतराळाविषयीचे माझे कुतूहल एकदम जागे झाले. चंद्र, ग्रह, गॅलक्सी, तारे यांच्याविषयी मला वेगवेगळे प्रश्न पडू लागले आणि मी तासन तास त्यांचा अभ्यास करू लागलो.” या कुतुहलातूनच एरोस्पेस इंजिनियर होण्याचे स्वप्न तो बघू लागला. ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ त्याचा प्रेरणास्रोत आहेत. आर्यनची महत्त्वाकांक्षा जाणल्यानंतर बिग बी इतके प्रभावित झाले! ते उद्गारले, “भारताचे भविष्य चांगल्या हातांमध्ये आहे. त्याचे कारण आमच्यासमोर बसले आहे!” आपल्या नेहमीच्या खेळकर शैलीत बिग बी म्हणाले, “तू वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ISRO विषयी बोलत आहेस. त्या वयात तर मला माझ्या पायजम्याची नाडी देखील बांधता येत नव्हती (हसतात). तुझे अभिनंदन, तुझे स्वप्न साकार होवो!”
आर्यन केवळ आपल्या बुद्धिमत्तेमुळे उठून दिसला नाही, तर त्याचा झटपट विचार करण्याचा आणि समस्या सोडवण्याचा गुण देखील सगळ्यांना दिसला. अमिताभ बच्चन यांनी त्याला एक आव्हान देत सांगितले, “आमचे कम्प्युटर महाशय परीक्षा घेत राहतात. ते तुला एक आव्हान देत आहेत. 90 सेकंदात तुला तीन रुबिक क्यूब सॉल्व्ह करायचे आहेत. ते त्रिकोणी आकाराचे आहेत, जे मी तर पहिल्यांदाच पाहतो आहे.” आर्यनने शांतपणे आव्हान स्वीकारले आणि आपल्या कौशल्याने सगळ्यांना थक्क करून सोडले. त्याच्या झटपट हालचाली पाहून खुद्द बिग बी सुद्धा अवाक झाले.
हलक्या फुलक्या गप्पांच्या ओघात जेव्हा आर्यनला सोनम बाजवाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो लाजला. पण अमिताभ बच्चन यांनी त्याला एक खास सर्प्राइज दिले. त्यांनी सोनम बाजवाला व्हिडिओ कॉल लावला जे पाहून आर्यन आनंदला. तो कॉल झाल्यानंतर भांगडा करून आर्यनने आपला आनंद साजरा केला आणि प्रेक्षकांना देखील आपल्या आनंदात सामील करून घेतले.
असे मस्तीचे क्षण अनुभवा, अमिताभ बच्चन सोबत, कौन बनेगा करोडपती 16 च्या ज्युनियर्स वीकमध्ये रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!