Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉयचा राजा सोमेश्वर म्हणून राज्याभिषेक

0 3 2 9 4 9

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉयचा राजा सोमेश्वर म्हणून राज्याभिषेक

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या ऐतिहासिक मालिकेचे दमदार कथानक, भव्य व्हिज्युअल्स आणि ताकदीचे परफॉर्मन्स यामुळे प्रेक्षक मोहित झाले आहेत. भारताच्या एका महान शासकाचे चरित्र उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत एक महत्त्वाचा टप्पा आला आहे. चौहान राजवंशातील राजा सोमेश्वर (रोनित रॉय)चा राज्याभिषेक होणार आहे.
आपल्या मोठ्या भावाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर राजा सोमेश्वर राज्याची जबाबदारी पेलण्यासाठी पुढे होतो. तत्वनिष्ठा, सद्वर्तन आणि बुद्धीचातुर्य याबद्दल ओळखल्या जाणाऱ्या राजा सोमेश्वरला मूल्यांची सखोल जाण आहे आणि तो न्यायनिष्ठ आहे. आता तो अभिषिक्त राजा आहे आणि प्रजा त्याच्याकडे आदराने आणि मोठ्या आशेने बघत आहे. इथून अजमेरच्या राजघराण्यातील नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे.
या कथानकाविषयी बोलताना रोनित बोस रॉय म्हणतो, “राजा सोमेश्वर पडद्यावर साकारण्याचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे, केवळ एक अभिनेता म्हणून नाही, तर एक व्यक्ती म्हणून देखील. सोमेश्वर एक अत्यंत प्रामाणिक, सचोटीने वागणारा माणूस आहे, जो मूक सामर्थ्याने आणि सुजाणतेने राज्याचा भार वाहतो. राज्याभिषेकाचे दृश्य हा मालिकेतील एक लक्षणीय टप्पा आहे. मला तो अत्यंत व्यक्तिगत स्तरावर मनास भिडला. एक अभिनेता म्हणून मला नेहमी अशा भूमिकांनी आकर्षित केले आहे, ज्यांच्यात आंतरिक आव्हान होते. ही त्यापैकीच एक भूमिका आहे. मला आठवते आहे राज्याभिषेकाचे दृश्य करताना मी राजाच्या पोषाखात या भव्य सेटवर उभा होतो, आजूबाजूस मंत्रोच्चार सुरू होता- आणि क्षणभर सारे काही स्तब्ध झाले. मी वेगळ्याच विश्वात पोहोचलो. एका दृश्याचे शूटिंग चालू आहे असे वाटलेच नाही. मला खरोखर असे वाटत होते की मी अशा राजाच्या भूमिकेत शिरत आहे, ज्याच्या प्रत्येक पावलाचा काही तरी अर्थ आहे. त्याची भूमिका करताना मला हे उमगले की मी मुळात अभिनेता का झालो- अशा सार्थक गोष्टी जगाला सांगण्यासाठी! आणि अशा उदात्त व्यक्तिरेखांमध्ये स्वतःला हरवण्यासाठी!”
हा महत्त्वाचा क्षण जरूर अनुभवा- सोमवार ते शुक्रवार रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे