Breaking
क्रिडा व मनोरंजन

जुबिली टॉकीज़ची अभिनेत्री क्रिसान बॅरेटो म्हणाली…

0 1 5 1 2 3

जुबिली टॉकीज़ची अभिनेत्री क्रिसान बॅरेटो आयरा सिंघानियाचे पात्र सादर करताना म्हणाली, “एक चतुर पात्र असूनही मी आयरची सत्यता सादर करण्यावर लक्ष केंद्रीत करते..”

सोनी एंटरटेनमेंट टेलीविज़नवरील मनोरंजक ड्रामा, ‘जुबिली टॉकीज़ – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ च्या नव्या भागात शिवांगी (खुशी दुबे) आणि आयरा (क्रिसान बॅरेटो) यांच्यामधील स्पर्धा वाढतच आहे. यामुळे मालिकेत भरपूर मनोरंजन होत आहे. आयराच्या अनेक प्रयत्नांनंतरही अयान ग्रोवर उर्फ एजी (अभिषेक बजाज) चा शिवांगीवर पूर्ण विश्वास असतो. यामुळे आयरा नाराज होते. कथेचा आणखी रंजक मुद्दा म्हणजे, जेव्हा गोल्डी मामा (राजीव कुमार) एका चित्रपटाच्या लाँच इवेंटदरम्यान एजीसोबत आयराला लाँच करण्याची घोषणा करतात. आता आणखी नवे नाट्य घडते. एका चर्चेदरम्यान, आयराची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिसान बॅरेटो ने ‘जुबिली टॉकीज़ – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील नव्या पर्वाविषयी मोकळेपणाने चर्चा केली.

 1. मालिकेत खलनायक म्हणून तुम्ही या पात्रासाठी कशी तयारी केली?

 मी ज्युबिली टॉकीज खूप एकाग्रतेने पाहिले, आयराचे पात्र आणखी खरेपणाने साकारण्यासाठी काय करू शकते, विशेषत: कथा आता तर खूप प्रभावी होत आहे..यासाठी मी काय करू शकते, याचा अभ्यास केला. आयराच्या पात्रातील लहान लहान बारकावे आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रीत केले. आयरा एजीवर प्रेम करते, ती चतुर पण आकर्षक आहे. पण एजीला ही गोष्ट माहिती नाहीये. एक अभिनेत्रीच्या रुपात हे पात्र साकारणे माझ्यासाठी खूपच आनंददायी आहे. तिचे हेतू आणि भावना कशा प्रकारे दाखवता येतील, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. तिचे वर्तन अधिक ठसवता येईल तसेच ती आकर्षक दिसेल, अशा दोन्ही गोष्टी साकारताना मालिका नाट्यमय दिसण्यासाठी जास्तीत जास्त पैलूंवर काम केले.

2. आयरा प्रासंगिक आणि चतुर अशी दोन्ही आहे, याचे संतुलन तुम्ही कसे साधले?

एक चतुर पात्र असल्याने मी आयराचा खरेपणा सादर करण्यावर लक्ष केंद्रीत करते. ती जगाकडे स्वत:च्या चश्म्यातून पाहत असते. तिच्या याच दृष्टीकोनातून तिला प्रेरणा मिळत असते. मी त्या भावना पूर्णपणे दर्शवण्याचा प्रयत्न करते. लेखकांनी तिचे सीन इतके सुंदर रचले आहेत की आयराची जटीलता सादर करणे सोपे होते. ती सामान्य खलनायिकांपेक्षा कित्येक पटींनी वेगळी आहे. ती एक संघर्षशील व्यक्ती आहे. तिची एक कथा आहे.

3. मालिकेत तुम्ही शिवांगीला एजीच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात… पण प्रत्यक्षात खुशी दुबे आणि अभिषेक बजाजसोबत तुमचे नाते कसे आहे?

मला खुशी खूप आवडते. ती खूप गोड आहे. आम्ही सेटवर खूप हसतो. तिच्यासोबत सीन करण्याची एक मजा असते. अभिषेक असताना आम्ही तिघेही नेहमी एकत्र असते. त्यामुळे एक मस्त ऊर्जा असते. अभिषेकसोबत काम करण्याचा अनुभवही छान आहे. या दोघांसोबत काम करायला मला खूप आवडते.

4. प्रेक्षकांना पुढील कथेत काय पाहता येईल?

जुबिली टॉकीज़ ही चित्रपट सृष्टीवर आधारीत मालिका असून पुढील कथेचं वर्णन करताना मला एक डायलॉग म्हणावा वाटतोय… “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”। आगामी भागात भरपूर ट्विस्ट आणि टर्न असतील. ज्यांची कुणी कल्पनाही करणार नाहीत. आयरा एक दृढनिश्चयी आणि जिद्दी मुलगी आहे. भरपूर ड्राम आणि सरप्राइज सादर करण्यासाठी ती सज्ज आहे. पुढील भागात दमदार एक्सपोज, ड्रामा आणि एक्शन दाखवले जाईल.

पाहत रहा जुबिली टॉकीज़: शोहरत.शिद्दत.मोहब्बत, दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलीविज़न वर…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे