नांदगाव, ऑफिस सुनावणीची तारीख दिली, अपील अधिकारी, शासकीय माहिती अधिकारी उपस्थित नाहीत

नांदगाव, ऑफिस सुनावणीची तारीख दिली, अपील अधिकारी, शासकीय माहिती अधिकारी उपस्थित नाहीत
नांदगाव-प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):-
नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील मुक्ताराम बागुल यांनी नांदगाव पंचायत समितीकडे माहिती अधिकार अर्ज दिला असता त्यांनी तो रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत कडे वर्ग केला केला. ग्रामपंचायत माहिती मुदतीच्या आत न दिल्याने त्यांनी नांदगाव पंचायत समितीकडे अपील दाखल केले. त्या अपीलची सुनावणी दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता विस्तार अधिकारी (ग्रा.पं) पंचायत समिती नांदगाव यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. परंतु प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी ,(ग्रा.पं) पंचायत समिती नांदगाव श्री देवरे साहेब व शासकीय माहिती अधिकारी तथा ग्राम पंचायत अधिकारी ग्रामपंचायत रोहिणी बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हे अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत उपस्थित राहिले नाही. शेवटी तीन वाजेनंतर मुक्ताराम बागुल यांनी निराश होऊन गट विकास अधिकारी सो. पंचायत नांदगाव तथा प्रथम अप्पीलिय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (ग्रा.पं) पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून या अर्जामध्ये म्हटले आहे की दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम आपली अर्ज दाखल केला होता ते अर्जानुसार दिनांक 24 2 2025 रोजी अकरा वाजता सोनवणे करिता विस्तार अधिकारी (ग्रा.पं) पंचायत समिती नांदगाव यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. मी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत उपस्थित झालो परंतु सुनावणी अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं) देवरे तसेच रोहिणी बुद्रुक शासकीय माहिती अधिकारी तथा ग्राम पंचायत अधिकारी आर एम मगर उपस्थित नसल्यामुळे मी तीन वाजेनंतर बॅलन्स सोडून माघारी गेलो तरी योग्य ती कार्यवाही करून मला न्याय देऊन मी मागितलेली माहिती सविस्तर पूर्ण द्यावी अशी मागणी सदर अर्जामध्ये केली आहे. शासकीय माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी अधिकारी तथा विस्तार हे वेळ काढू पणा करत असल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) पंचायत समिती नांदगाव आणि शासकीय माहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत रोहिणी बुद्रुक तालुका नांदगाव श्री मगर साहेब काय भूमिका घेतात याकडे बघणे गरजेचे आहे.