Breaking
आरोग्य व शिक्षणसामाजिक

विंचूर येथे हृदयविकार तपासणीसाठी मोफत महाशिबिर; गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही होणार

0 4 2 9 5 7

विंचूर येथे हृदयविकार तपासणीसाठी मोफत महाशिबिर; गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही होणार

लासलगाव:
विंचूर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी तपोवन हार्ट क्लिनिक, नाशिक आणि डॉ. दरेकर हार्ट क्लिनिक, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत विंचूर-लासलगाव रोडवरील होळकर वेशीसमोर असलेल्या विंचूर प्लाझा येथे संपन्न होणार आहे.
हृदयविकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, हृदयविकार तज्ञ डॉ. सुरेश पांडुरंग पाटील या शिबिरात रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना गंभीर हृदयविकाराचे निदान होईल, अशा रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नाशिक येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या शिबिरामध्ये रुग्णांसाठी विविध महागड्या चाचण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने २डी इको (2D Echo), एचबीए१सी (HBA1C- तीन महिन्यांची साखर), लिपीड प्रोफाईल, युरिक ॲसिड, ईसीजी (ECG), रक्तदाब (B.P.) आणि हिमोग्लोबिन तपासणीचा समावेश आहे. या सर्व चाचण्यांनंतर हृदयविकार तज्ञांकडून मोफत सल्लाही दिला जाणार आहे.
ज्या नागरिकांना वारंवार छातीत दुखणे, छातीत जळजळ होणे, जीव घाबरा होणे, अवाजवी घाम येणे, उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास होणे, पाय सुजणे किंवा खांदा व हातामध्ये वेदना होणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराला येताना रुग्णांनी आपल्या जुन्या फाईल्स, रिपोर्ट आणि सुरू असलेली औषधे सोबत आणणे आवश्यक आहे.
या शिबिराचे नियोजन डॉ. सुरेश माधवराव (भाऊ) दरेकर आणि डॉ. वसुंधरा सुरेश पाटील (दरेकर) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०१२९५३४ किंवा ७२६३०९५४८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

1/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे