Breaking
ब्रेकिंग

विंचूरमध्ये मुद्देमालासह दोघांना अटक

0 4 9 0 5 8

लासलगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीच्या गुन्ह्याचा छडा, ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 किरण कुमार आवारे…

शिरवाडे वाकद:- लासलगाव पोलिसांनी पहाटेच्या गस्तीदरम्यान संशयित दोन इसमांना ताब्यात घेत चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला. संशयितांकडून चोरीची मोटारसायकल, मोबाईल, स्क्रूड्रायव्हरसह एकूण ३५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

      दि.३० ऑगस्ट रोजी पहाटे लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागीय गस्त सुरू असताना विंचूर परिसरात पोलिसांना दोन संशयित इसम आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात नंबर प्लेट नसलेली हिरो होंडा मोटारसायकल आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता ते वाहन पिंपरी- चिंचवड, पुणे येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

   संशयितांची नावे विक्रम भरत यादव (रा. उपळवाडी, ता.माढा, जि.सोलापूर) आणि कृष्णाकांत रामासुमिर विश्वकर्मा (रा.सतना, मध्यप्रदेश) अशी आहेत. चौकशीत त्यांनी सदर मोटारसायकल पिंपरी-चिंचवड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल, स्क्रूड्रायव्हर व विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३५ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चोरी, घरफोडी तसेच महिला व मुलींशी संबंधित गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस.स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स.पो.नि. सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण साळुंके तसेच पोलीस कर्मचारी अरुण डोंगरे, ज्ञानेश्वर जाधव, शशिकांत निकम, संदिप डगळे, सागर आरोटे, अवधुत होंडे, अविनाश सांगळे आणि चालक पोलीस शिपाई कैलास घोलप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 0 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे