‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये तेजस्वीने बनवलेला रिसोट्टो खाऊन प्रेक्षक निःशब्द झाले!

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये तेजस्वीने बनवलेला रिसोट्टो खाऊन प्रेक्षक निःशब्द झाले!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाककृतींमधील चढाओढीचे तीव्र क्षण बघायला मिळतात. यावेळी स्पर्धकांसमोर एक अगदी नवीन आव्हान आहे – इटली व्हाया इंडिया’! या आव्हानात स्पर्धकांना 90 मिनिटांच्या समय मर्यादेत इटलीच्या राष्ट्रध्वजातील एक रंग प्रामुख्याने दिसेल अशी डिश बनवण्यात आपली हुशारी आणि सर्जनशिलता दाखवायची आहे. तेजस्वीने त्यातील सफेद रंग निवडला आणि खास रिसोट्टो बनवण्यात आपले कौशल्य पणाला लावले.
रिसोट्टो चाखल्यावर प्रतिक्रिया देताना शेफ रणवीर ब्रार म्हणाला, “जेव्हा तू हा पदार्थ चाखलास, तेव्हा तुला तुझ्या आईची आठवण आली का? यामध्ये तुला ज्या भावना अभिप्रेत होत्या, त्या आल्या आहेत का? त्यानंतर नाटकीपणाने त्याने आपला चमचा टेबलावर आपटत म्हटले की ‘ही तुझी सर्वोत्तम डिश आहे.”
सर्प्राइज इथेच थांबले नाही. प्रभावित झालेल्या फराह खानने तेजस्वीच्या हाताचे चुंबन घेऊन तिचे कौतुक केले. ती म्हणाली, “मी आजवर खाल्लेला हा सर्वोत्तम रिसोट्टो आहे. मला खरं तर रिसोट्टो आवडतच नाही, पण याचा स्वाद काही औरच आहे!” या प्रतिक्रिया ऐकून तेजस्वी भारावून गेलेली दिसली.
या क्षणामुळे या स्पर्धेत चढाओढ करण्याचा तेजस्वीचा आत्मविश्वास आणखी वाढेल का? बघा सेलिब्रिटी मास्टरशेफ मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्ह वर!