Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

विंचूरमध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार लासलगाव पोलिसांच्या ताब्यात; ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

0 4 8 5 2 0

विंचूरमध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार लासलगाव पोलिसांच्या ताब्यात; ४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विंचूर, ता. १९ : विंचूर येथील इलेक्ट्रिकल व हार्डवेअर दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लासलगाव पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल, सॅन्ट्रो कार तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी साधने असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

         पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ता. १८  रोजी मध्यरात्री विठ्ठलवाडी येथील रहिवासी गोकुळ बाळनाथ काळे यांच्या विंचूर येथील लासलगाव रोडवरील लोंणजाईमाता इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला .दुकानातून विविध कंपन्यांच्या वायरची सुमारे ३ लाख ४३ हजार २१६ रुपये किमतीची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

        नाशिक जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई सुरू करून ता. १९ रोजी पहाटे ३ वाजता विंचूर परिसरात नाकाबंदी करण्यात आली . यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार अमोल तळेकर यांना विंचूर भागात संशयित वाहन फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाचा पाठलाग केला असता. संशयितांनी वाहन विंचूर-निफाड मार्गावरून विंचूर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळविले.पोलिसांनी या वाहनाचा  पाठलाग करून ते थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीचा मुद्देमाल तसेच लोखंडी कटर व पहार आढळून आले.

       संशयिताची चौकशी केली असता त्याने विंचूर परिसरातील इलेक्ट्रिकल व हार्डवेअर दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित खुर्शीद अब्दुल हमीद खान (मूळ रा. धानोरा मुस्तकम, ता. सोहरतगढ, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रहिवासी आंबेडकरनगर, इगतपुरी) याला अटक करण्यात आली .

      पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ४३ हजार २१६ रुपयांचा चोरीचा माल, सुमारे १ लाख रुपये किमतीची सॅन्ट्रो कार (एमएच ०४ एएम ३४६७), लोखंडी कटर व पहार असा एकूण ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

           अटक आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात, तसेच त्याचे इतर साथीदार कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपीला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. तसेच निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे