कृषीवार्ता
तळेगाव येथे कृषी सहाय्यक कविता नाईक यांच्याकडून शेतकरी ओळखपत्रासाठी घरोघरी जाऊन प्रचार प्रसार

0
3
2
1
2
3
तळेगाव येथे कृषी सहाय्यक कविता नाईक यांच्याकडून शेतकरी ओळखपत्रासाठी घरोघरी जाऊन प्रचार प्रसार
इगतपुरी ( प्रतिनिधी )
कृषी विभागाच्या महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अतिशय महत्वाचे असून त्याचा लाभ शेतकरी बांधवांनी घेऊन ३१ मार्चपर्यंत ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन कृषी सहाय्यक कविता नाईक यांनी केले. इगतपुरी तालुक्यात तालुका कृषीअधिकारी रामदास मडके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असून तळेगाव येथे केंद्रशासन व महाराष्ट्र शासन योजनेअंतर्गत शेतकरी ओळख पत्र (फार्मर आईडी) शेतकरी बांधवांनी तात्काळ काढून घेण्यासाठी कृषी सहाय्यक कविता नाईक यांनी शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन अधिक माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी ओळख पत्र (फार्मर आईडी) साठी तळेगाव येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कृषी सहाय्यक नाईक यांनी शेतकऱ्याना फार्मर आयडीबाबत घरोघरी जाऊन माहिती दिली. यामुळे येथील जास्त शेतकऱ्यानी ओळखपत्र काढून घेतली आहेत. याप्रसंगी नगरसेवक बाळू मेंगाळ, नामदेव लोहरे, ज्ञानेश्वर रायकर आदी शेतकरी उपस्थित होते.
0
3
2
1
2
3