गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक
कोट्यवधीची फसवणूक प्रकरणी सतीश काळेचा जामीन अर्ज फेटाळला

0
2
5
5
5
9
स्टार इन्स्पायर कंपनीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
फसवणुकीचा आकडा सुमारे ११० कोटींच्या पुढे
लासलगाव व परिसरातील जनतेला स्टार इन्स्पायर प्रा. ली. कंपनी च्या संचालकांनी दाम दुप्पट देण्याच्या अमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. या गुन्ह्यातील आरोपी सतीश काळे हा धाराशिव मध्यवर्ती कारागृहात जेलबंद असून अनिता शिंदे आणि बाळू आनंदा हे नाशिक मध्यवर्ती करागृहात आहे. या गुन्हेगारांच्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा न्यायधीश एस बी कोऱ्हाळे यांचे निफाड येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी झाली.
यावेळी आरोपींच्या वतीने न्यायालयात आम्ही निर्दोष असून आमचा व गुन्ह्याचा कोणताही संबंध नाही, आम्हाला कोणतेही लाभ मिळालेले नाहीत व आम्ही गुंतवणूकदारांना रक्कम देण्यास तयार नाही, जेलमधून गुंतवणूकदारांना उद्देशून पत्रक कधीही काढले नाही इ. मुद्द्यावर युक्तिवाद करण्यात आला. मुळ फिर्यादी सोमनाथ गांगुर्डे यांच्या वतीने ॲड.तुकाराम जाधव यांनी सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने बाजू मांडत लेखी युक्तिवाद सादर केला. सदर खटल्यात ॲड.रामनाथ शिंदे यांनी सरकारची बाजू मांडत जामीनास प्रखर विरोध केला. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर निफाड जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायधीश एस. बी. कोऱ्हाळे यांनी आरोपी सतीश काळे व अनिता शिंदे यांचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
सुरवातीस दाखल आरोप पत्राप्रमाणे १० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले होते, मात्र गुन्हे शाखा नाशिकचे तपासी अधिकारी श्री.मगर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे फसवणूकीचा आकडा सुमारे ११० कोटींपेक्षा जास्त आहे.
0
2
5
5
5
9