Breaking
धार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

योगामधील प्रस्तुत केलेल्या दिव्य गीतांद्वारे भगवंताची आठवण होते व तन आणि मन दोन्ही शुद्ध, सुदृढ होते – ब्रह्माकुमारी पूनम दीदी

संगीतमय योगा ग्रुप चा द्वितीय वर्धापन उत्साहात संपन्न

0 3 2 1 2 3

योगामधील प्रस्तुत केलेल्या दिव्य गीतांद्वारे भगवंताची आठवण होते व तन आणि मन दोन्ही शुद्ध, सुदृढ होते – ब्रह्माकुमारी पूनम दीदी

आरोग्य संपदा संगीतमय योगा परिवार संचलित शिवसत्त्य ग्राउंड व समर्थ जॉगिंग ट्रॅक संगीतमय योगा ग्रुप चा द्वितीय वर्धापन उत्साहात संपन्न झाला

नाशिक — मानवी जीवन, सुखी ,संपन्न व आनंदी होण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. आपले मन तंदुरुस्त, सुदृढ व शक्तिशाली राहण्यासाठी राजयोग मेडिटेशन शिकविले जाते. त्याच पद्धतीने डॉ. उज्वल कापडणीस यांच्याद्वारे खूप चांगल्या पद्धतीने तन व मन दोघी सुदृढ राहील यासाठी म्युझिकल योगा प्रस्तुत केलेला आहे. या म्युझिकल योगाद्वारे अनेकांनी आपले जीवन श्रेष्ठ बनवले आहे.या योगामधील प्रस्तुत केलेल्या दिव्य गीतांद्वारे भगवंताची आठवण होते व तन आणि मन दोन्ही शुद्ध , सुदृढ होते. या म्युझिकल योगाचा प्रचार प्रसार सर्वत्र दूर पर्यंत व्हावा, या योगा प्रकारातून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी संपन्न व समृद्ध बनावे अशा शब्दात ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आरोग्य संपदा संगीतमय योगा परिवार संचलित शिवसत्त्य ग्राउंड व समर्थ जॉगिंग ट्रॅक संगीतमय योगा ग्रुप चा द्वितीय वर्धापन दिन सोहळा दिनांक 16 मार्च रविवार रोजी नाशिक येथील, भावबंधन मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी पूनम दीदी, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा ताई हिरे, नगरसेविका सीमाताई निगळ, समाजसेविका स्वाती भामरे, डॉ. राजेश जावळे, ब्रह्माकुमार सुरेश साळुंखे, धुळ्याचे योग शिक्षक अशोक शिंदे, प्रा.जगदीश खैरनार सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. नाशिकच्या योग साधकांनी म्युझिकल योगा स्टेप्स करून मान्यवरांना मानवंदना दिली. कुमारी सहर्षा निकम हिने स्वागत नृत्य प्रस्तुत केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित देवयानी फरांदे यांनी या स्तुत्य उपक्रमाचा भरभरून कौतुक केले. मानसिक ताणतणावामुळे अनेक त्रास उद्भवलेले आहेत. असे म्हटले जाते की धनसंपदेपेक्षा आरोग्य संपदा ही मोठी आहे ही आरोग्य संपदा देण्याचे कार्य श्री व सौ कापडणीस दांपत्य मोठ्या उत्साहाने आपण सर्वांना देत आहेत. डॉ. उज्वल कापडणीस हे स्वतः मधुमेह तज्ञ असून आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसच्या पलीकडे जाऊन ते रुग्णांना पूर्णतः रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजामध्ये असे क्वचितच उदाहरण आहेत की जे डॉक्टर स्वार्थ सोडून रुग्णांच्या भल्यासाठी आपले प्रॅक्टिसच्या पलीकडे जाऊन कार्य करीत आहेत. भारताची जी मूळ व प्राचीन ओळख योग हे आपल्या माध्यमातून घडत आहे त्यामुळे मी डॉक्टर कापडणीस यांचे खूप अभिनंदन करते. मलाही या म्युझिकल योगामध्ये येण्याची मनस्वी इच्छा आहे परंतु दैनंदिन व्यस्ततेमुळे शक्य न होण्याची खंत फरांदे यांनी व्यक्त केली.
आमदार सीमाताइ हिरे यांनी सांगितले की आजपर्यंत अनेक योगाचार्यांनी विविध ,वेगवेगळे योगा प्रकार प्रस्तुत केलेले आहेत, त्यासोबतच डॉक्टर कापडणीस यांचाही म्युझिकल योगा द्वारे येथे खूप चांगले कार्य घडत आहे. या सर्व योगा प्रकारांचे मूळ, ध्यान साधना आहे. भारताची मूळ परंपरा ही ध्यान साधनेची असून या म्युझिकल योगा मधून सुद्धा ध्यान धारणा प्रस्तुत केलेली आहे. ह्या योगा ग्रुप मध्ये एक परिवार असून येथील सदस्यांचे पारिवारिक घट्ट नाते तयार झालेले आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मी ही रोज ठरवते की आपणही जॉगिंग ट्रॅक वर जावे मात्र सातत्य व नियमितता न राहिल्याने त्यातही खंड पडत जातो, मात्र आपल्या या योगा प्रकारातून नियमित येण्याची सवय पडत असते व अनेकांचा नियमित होण्याचा हा अनुभव मलाही प्रेरणादायी आहे असे सीमाताईंनी याप्रसंगी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉक्टर उज्वल कापडणीस यांनी सांगितले की माझ्या घरातून हा योगा प्रकार 2017 साली सुरू झाला. जसे म्हटले जाते की, प्रत्येक डॉक्टर हा पेशंटला व्यायाम करा हा सल्ला देत असतो, मात्र स्वतः त्या व्यायाम प्रकारातून दूर राहतो मात्र आईसाठी सुरू केलेला हा योगा प्रवास माझ्या अनेक मधुमेही रुग्णांनासाठी मी सुरू केला. अनेकांना त्याचे चांगले रिझल्ट मिळाले व बघता बघता हा योगा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर पसरला. मात्र यामागील सूक्ष्म प्रेरणा ही स्वयं निराकार शिव परमात्म्याची आहे आमच्या ब्रह्माकुमारी भगिनींच्या शुभ आशीर्वादाने या योगा प्रकाराला बळ मिळाले व भगवंताच्या कृपेनेच म्युझिकल योगा इतका पसरलेला आहे.
डॉक्टर मनीषा कापडणीस यांनी सांगितले की या म्युझिकल योगामध्ये येणाऱ्या साधकां कडुन इतकं प्रेम व आदर मिळतो, की इतके प्रेम व स्नेह लौकिक परिवारांमधून सुद्धा मिळत नाही इतका हा परिवार येथे आल्यावर गोड वाटायला लागतो. नियमित या म्युझिकल योगाला येऊन येथील ध्यान साधनेत मगन व्हावेसे वाटते .या योगा प्रकारातून अनेकांना व्याधीमुक्त रोगमुक्त व ताजी तवाने झालेले बघितल्यावर मनस्वी आनंद होतो अशा शब्दात डॉक्टर मनीषा कापडणीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ राज योगी ब्रह्माकुमार सुरेश साळुंखे यांनी सांगितले की समाजात आज जी विकृती निर्माण झालेली आहे ,त्याचे जबाबदार आपण सर्व आहोत, कारण समाजात कोणी व्यक्ती वाईट कर्म करण्यासाठी तेव्हाच प्रवृत्त होतो जेव्हा त्या समाजात वाईट प्रकल्प पसरलेले असतात त्यामुळे ह्या विकृतीला समोर नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या समाजात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी मेडिटेशनचे व्हायब्रेशन सर्वत्र दूर पर्यंत प्रकल्पित करावे जेणेकरून आपला समाज सुखी व संपन्न, शांत बनेल.

डॉ. राजेश जावळे यांनी आपल्या मनोगत आज सांगितले की डॉक्टर उज्वल कापडणीस व डॉक्टर मनीषा कापडणीस यांचे महान कार्य आपल्या समोर आहे. यांनी केलेले परिश्रम नियोजनबद्धता, कटिबद्धता यामुळे आपण सगळे येथे उपस्थित आहोत. मात्र या दांपत्याला इतक्या महान स्तरावर पोहोचवणारा एक निराकार शिव परमात्मा आहे. ते दोघी नियमितपणे भगवंताचे महावाक्य श्रवन करतात व आपले जीवन त्यांनी अध्यात्मिक मार्गावर लावले आहे. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गाने इतके काही करू शकतो तर आपणही त्यांच्या या अध्यात्मिक मार्गाला म्हणजेच ते करीत असलेल्या ब्रह्माकुमारी राजयोग मेडिटेशनला करणे खूप आवश्यक आहे. या राजयोग ध्यान कोर्समुळे व्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल होऊन तो मनुष्या पासून देवता बनतो. आपल्या येथे अनेक योगाचे ग्रुप तयार झाले आहेत व हे ग्रुप संपूर्ण नाशिकमध्ये होवोत हीच शुभेच्छा.
धुळ्यातून विशेष उपस्थित योगा शिक्षक अशोक शिंदे यांनी सांगितले की डॉ. उज्वल कापडणीस यांच्यासोबत माझी धुळ्याला भेट झाली यातून म्युझिकल योगाचा प्रयोग सुरू केला व बघता बघता २००/३०० सदस्य तयार झाले. त्यातून धुळे शहरात 34 ग्रुप तयार झाले.
मालेगाव येथील ,प्रा.जगदीश खैरनार सर यांनी सांगितले की, हा सुंदर उपक्रम असून असे वाटते की आमचे डॉ. कापडणीस दांपत्य आमच्याकडून तुम्ही घेऊन घेतले की काय… मात्र तुमच्या प्रत्येकात मला हे दोघे दांपत्य दिसत आहेत. डॉ. उज्वल कापडणीस यांचा अलविदा डायबेटिस शिबिराच्या माध्यमातून खूप वृहद् कार्य होत असून हे कार्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
अँड. अशोक रुमने पाटील यांनी ही भारुड प्रस्तुत करून संगीतमयोग विषयी जनजागृती केली. बासरी वादन करून विजय महाजन यांनी उपस्थितांना अंतर्मनाची सैर करून दिली.
बिरारी सर, सटाण्याचे सिद्धी योगा ग्रुप चे मनीषा सोनवणे, आशाताई पाटील, मनीषा पाचपाटील आदींनी आपले अनुभव प्रस्तुत केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने धुळे ,सटाणा, मालेगाव व नाशिक मधील अनेक योगा ग्रुप मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन ऍड. .सुनील पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रूपाली शिरोडे यांनी केले. हर्षाली निकम व सचिन निकम व आशाताई शिंदे आदींनी उत्कृष्ट नियोजन केले. यांनी याप्रसंगी उपस्थित योग शिक्षकांना सत्कार करून प्रोत्साहित केले गेले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे