Breaking
महाराष्ट्रसत्कारसंपादकीयसामाजिक

माणुसकीच्या परिघात रमणारे व्यक्तिमत्व : दत्तात्रेय भाऊ जोंधळे

0 4 2 9 5 7

सागर निकाळे निफाड…

प्रतिनिधी-

अलीकडच्या काळात सर्वजण तंत्रस्नेही होत असताना स्नेहीजणांचा सहवास विरळ होत असल्याचे चित्र आहे. सामाजिक माध्यमांमधील व्यस्तता वाढल्याने आपल्या जवळच्या परिघात आपल्या माणसांचाच सहवास मिळणे दुरापास्त झाले आहे. परंतु, आजही अशी काही माणसे आहेत, जी आपल्या सभोवती माणसांचा परीघ व्यापून आहेत. आपल्या भोवती माणसांचा गोतावळा टिकवून आहेत, त्यापैकी एक नाव म्हणजे दत्तात्रेय (भाऊ) जोंधळे. आज,बुधवार (दि. १७) त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख…
————————-
अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक विस्तार असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष /सचिव श्री. दत्तात्रेय (भाऊ) जोंधळे यांनी शैक्षणिक संस्थेत कार्याध्यक्ष /सचिव म्हणून जबाबदारी हाती घेतल्यापासून संस्थांतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये त्यांनी अनेक आमूलाग्र बदल केले. आपल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी वेळोवेळी बदल सुचवून, सूचना मागवून प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांना त्याची अंमलबजावणी करण्यास ते सांगतात. विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न बनता, तो ज्ञानार्थी झाला पाहिजे, यावर त्यांचा नेहमीच भर असतो.
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. गुलाबराव (अण्णाजी) जोंधळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वारसा दत्तात्रेय भाऊंना लाभला असून, त्यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यातून अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. ‘माणुसकीने माणसे जोडावीत’ इतके साधे तत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यात जपले आहे. आई-वडिलांनी केलेल्या चांगल्या संस्कारांमुळे माणसे जोडण्याची कला त्यांनी आत्मसात केली आहे. कृषी, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यात केवळ सक्रिय न राहता त्यात काहीतरी ठोस, ठळक करण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र शिर्डी येथे जाणाऱ्या अगस्ती महाराज व साईबाबा यांच्या दिंडीत तन-मन-धनाने सहभागी होत, ते गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक क्षेत्रात आपला खारीचा वाटा उचलत आहेत. गुंजाळवाडी (ता. संगमनेर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत गावाला सहा लाख रुपयांचा तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी राहाता तालुक्यात सामाजिक व विधायक कार्य केले. राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात,पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.राजाराम पानगव्हाणे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेयभाऊ यांची शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वाटचाल प्रगतिपथावर आहे. वडील अध्यक्ष श्री.गुलाबराव अण्णाजी जोंधळे, उपाध्यक्ष श्री निवृत्तीनाना थेटे व मोठे बंधू उपप्राचार्य श्री दीपकभाऊ जोंधळे आदींबरोबर ते महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निमगाव जाळी, म्हरळ, तळेगाव दिघे, भोकणी, पालखेड (मि), उगाव (ता. निफाड) आदी गावांतील त्यांच्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांचा कारभार समर्थपणे पाहत आहेत. महाराष्ट्र शिक्षण संस्थेअंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जवळपास साडेसहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. इंग्लिश स्पीकिंग, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक उपक्रम, विद्यार्थी शिबिरे,आरोग्य शिबीरे,वृक्षारोपण,स्पर्धा परीक्षा तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन शैक्षणिक उपक्रम हा त्यांच्या दूरदृष्टीचाच परिणाम आहे.
शेतात रमताना त्यांनी डाळिंब, द्राक्ष शेतीत नवे प्रयोग करतानाच ते यशस्वी देखील केले आहेत. संगमनेर येथे सहज ऑटो, साई मेटल्सच्या माध्यमातून त्यांनी उद्योगाचीही मुहूर्तमेढ रोवली आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून ते नेहमीच दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले काम करून समाजऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतात. संयमी असण्याबरोबरच ते स्पष्टवक्ते आहेत. निर्भीड असण्याबरोबरच ते संकटसमयी इतरांच्या मदतीसाठी धावून जाणारे आहेत. माणसासाठी जे जमेल ते करणारे आहेत. त्यांच्यातील हा सामाजिक भाव टिकून राहो आणि त्यांच्या हातून आणखी सामाजिक सेवा घडण्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, या सदिच्छा!

राहुल दवते, निफाड
-कार्यवाह – निफाड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था

4.5/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे