Breaking
ब्रेकिंगराजकिय

ऍड. माणिकराव शिंदे यांचा टक्का वाढला, पण…

केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी

0 3 2 1 2 3

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांचा विजय झाला. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार  अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांना पराभूत केले. नुकत्याच हाती आलेल्या मतदार संघातील सर्व केंद्रांची मतदानाची आकडेवारी पाहता माणिकराव शिंदे यांना मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून येते. सन 2009 मध्ये  छगन भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मते मिळवत माणिकराव शिंदे यांचा पराभव केलेला होता. त्यावेळी शिवसेनेकडून उमेदवारी करत असताना माणिकराव शिंदे यांना 56 हजार 236 मते मिळालेली होती. म्हणजेच दोन्ही उमेदवारांच्या मतदानामध्ये 50 हजार हून अधिक मतांचा फरक होता. मात्र या निवडणुकीत  छगन भुजबळ हे 26400 मतांच्या फरकाने विजयी झालेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी ही निवडणूक यावेळी झाली. या वेळच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल असे येवला शहरातून दबक्या आवाजात म्हटले जायचे. पक्षप्रमुख शरद पवार यांची झालेली सभा आणि या सभेनंतर  छगन भुजबळ यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी प्रचारात वेग घेतला. अखेरच्या टप्प्यात सलग सभा घेत  वातावरण निर्मिती केली. त्याचा फायदा मतदानात झाल्याचे म्हटले जाते.

येवला लासलगाव विधानसभा मतदार संघातील केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे —
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे