Breaking
ब्रेकिंग

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलीस शेडचे उद्घाटन; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम

0 4 5 5 0 7

*अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलीस शेडचे उद्घाटन; सामाजिक बांधिलकीचा उपक्रम*

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष ट्रॅफिक पोलीस शेडचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील वाहतूक पोलिसांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे हा आहे.

या शेडचे उद्घाटन संयुक्त आयुक्त, वाहतूक विभाग मा. अद्विता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (PI) श्री. विश्वास पाटील तसेच वाहतूक विभागाचे पत्की साहेब हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला वाहतूक पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत सध्या ४ ट्रॅफिक पोलीस शेड युनिट्स शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे अधिकाधिक वाहतूक पोलिसांना याचा लाभ मिळणार आहे.

शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतात. उन्हाचा तडाखा, वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण यांचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेले हे शेड वाहतूक पोलिसांसाठी आधारस्तंभ ठरणार असून, त्यांना उन्हापासून आणि प्रदूषणापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाद्वारे “ट्रॅफिकची शिस्त” या सामाजिक संदेशालाही प्राधान्य देण्यात आले असून, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या प्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे विविध तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. संदीप सबनीस (GI सर्जन), डॉ. सागर काकतकर (ऑर्थोपेडिक सर्जन), डॉ. राहुल सुपे (ऑर्थोपेडिक सर्जन), डॉ. राकेश पाटील (MD मेडिसिन), डॉ. शेखर चिरमाडे (न्यूरो व स्पाइन सर्जन), डॉ. परेश अलवानी (MD मेडिसिन), डॉ. अखिलेश सोमानी (इमर्जन्सी मेडिसिन) आणि डॉ. हेमंत राज आहिरे (कार्डिओलॉजिस्ट) यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,

“सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचे काम अत्यंत आव्हानात्मक आहे आणि त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सध्या ४ युनिट्स उभारण्यात आली असून, येणाऱ्या काळात अशा आणखी उपक्रमांद्वारे आम्ही समाजासाठी अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करू. तसेच, येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही अशा सुविधा अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.”

या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांना काम करताना आवश्यक सुविधा मिळणार असून, त्यांच्या कार्यक्षमतेतही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने या उपक्रमाद्वारे केवळ आरोग्यसेवेतच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आपली जबाबदारी पार पाडत समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे