Breaking
ब्रेकिंग

किम्स मानवता हॉस्पिटल, यांच्या तर्फे मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबिर

0 4 2 9 5 7

किम्स मानवता हॉस्पिटल, यांच्या तर्फे मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबिर

नाशिक, दि. ६ ऑक्टोबर : उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक यांच्या तर्फे मोफत बाल हृदयरोग निदान शिबिर रविवारी, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. ललित लवणकर, सीनियर इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, अॅडव्हान्स कॉम्प्लेक्स हार्ट डिसीज स्पेशालिस्ट, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक करतील.

ज्या मुलांना खालील लक्षणे दिसून येतात जसे की, वजन न वाढणे, धाप लागणे, जोउल्योतर थकवा येणे, वारंवार निमोनिया होणे, दूध न पिणे, जन्मजात हृदयविकाराचे संशयित रुग्ण अशा सर्व मुलांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरात मुलांच्या हृदयविषयक तपासणीसह 2D इको तपासणी (मूल्य ₹2500) पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.

या शिबिराचा उद्देश बालकांमधील हृदयविकारांचे लवकर निदान करून वेळेवर उपचाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.या मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबिरास उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांनी लाभ घ्यावा व पूर्व नोंदणी आवश्यक असून, 8956947210 ,0253 6920000 क्रमांकावर संपर्क साधावा असे अव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे