मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
येवल्याचा विकास हेच आपल्यासाठी सर्वकाही – मंत्री छगन भुजबळ
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मंत्री छगन भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
भविष्यातील येवल्याच्या विकासासाठी आशिर्वाद द्या – मंत्री छगन भुजबळ
जात, पात, धर्म, पक्ष माझ्यासाठी सर्वच गौण – मंत्री छगन भुजबळ
येवल्याचा विकास हेच आपल्यासाठी सर्वकाही – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, येवला, दि. २४ ऑक्टोबर :- सन २००४ साली विकासापासून कोसोदूर असलेल्या येवल्यात विकास करण्यासाठी येथील येवलेकरांच्या आग्रहास्तव मी येथे आलो. त्यानंतर गेली वीस वर्ष येवल्याच्या विकासाठी मी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून येवला मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न केले. जात, पात,धर्म, पक्ष माझ्यासाठी सर्व गौण असून येवल्याचा विकास हेच आपल्यासाठी सर्वकाही असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय आठवले गट घटक पक्ष महा युतीच्या वतीने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर एन्झोकेम शाळेच्या मैदानावर त्यांनी उपस्थित बांधवाना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करत रॅलीला शुभारंभ केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक पराक्रमसिंह जडेजा, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते प्रचार प्रमुख अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, डि.के. जगताप, सुवर्णा जगताप, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, एल.जी.कदम, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनालीराजे पवार, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, राजश्री पहिलवान, राजेंद्र लोणारी, सुरज पटनी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतनसेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, बाळासाहेब कर्डक, धनंजय कुलकर्णी, बाबा डमाळे, समीर समदडीया, सुभाष पाटोळे, अशोक संकलेचा, भारतीय जनता पार्टीचे संयोजक आनंद शिंदे, नाना लहारे, बारकू गांगुर्डे, डॉ.श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, मंगेश गवळी, शेखर होळकर, कैलास सोनवणे, रामनाथ शेजवळ, अशोक नागरे, दत्तूपंत डुकरे, दत्तात्रय रायते, सचिन दरेकर, बाळसाहेब गुंड, शिवाजी सुपनर, मच्छिंद्र थोरात, राजेश भांडगे, संध्या पगारे, सुरेखा नागरे, सुलभा वरे, मकरंद सोनवणे, भागीनाथ पगारे, गोटू शिंदे, म्हसू घोडेराव, रावसाहेब आहेर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, शरद राउळ यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येवलेकरांच्या आग्रहास्तव जेव्हा मी येवल्यातून पहिल्यांदा उमेदवारी केली. त्यावेळी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य असे कितीतरी प्रश्न उभे होते. प्रथमतः पाण्याच्या प्रश्नावर आपण प्राधान्य दिले. रस्ते वीज पाणी या पायाभूत सुविधांचा परिपूर्ण विकास आपण करण्याचा प्रयत्न केला. आज मांजरपाडा, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालवा, यासह जलसिंचनाच्या अनेक कामांमुळे येवल्याची परिस्थिती बदलली आहे. जी लोक म्हणत होती की पूरपाणी येवल्याला मिळणे शक्य नाही. त्यांना आज सांगायचे आहे की यदांच्या पावसळ्यात दुसऱ्यांदा येवला तालुक्याला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होऊन सर्व बंधारे भरण्यात आले आहे. त्यामुळे आपला विश्वास अधिक दृढ झाला आहे. आपण एवढ्यावर थांबणार नाही तर पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून येवल्याला बारमाही पाणी उपलब्ध करून देऊ. आगामी दोन वर्षात हा प्रकल्प देखील मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले.