
0
3
2
1
2
3
लासलगाव ग्रामपंचायत, हरित सेना- लासलगाव आणि लासलगावातील पर्यावरण प्रेमी हे सर्व मिळुन लासलगाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन एक संघटनात्मक आणि परिणामकारक साखळी उभी करण्यासाठी सरसावले असुन त्यांची पहिली बैठक लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच योगिता पाटील, ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्या उपस्थितीत पार पडली.

लासलगाव आणि परिसर प्लास्टिक मुक्त करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून त्यासाठी काही सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतील असे उपस्थितीत सर्वांनी यावेळी मत मांडले.
या बैठकीत उद्योजक संतोष पलोड यांनी साचलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याविषयी मार्गदर्शन केले तर ‘वनस्थळी’ संस्थेच्या संचालिका अनिता गंधे यांनी एक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत किती मोठा प्लास्टिककचरा आपण जमा करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवले.
येत्या आठवड्या पासून विविध संस्थांना, नागरिकांना प्लास्टिक कचरा कमी करण्याबाबत आवाहन करण्यात येणार असून एक जनजागृती रॅली लासलगावातून काढण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय आणि श्री महावीर शाळेचे या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य असल्याचे शाळेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

या बैठकीसाठी अक्षय ब्रह्मेचा, प्रकाश दायमा,शंतनु पाटील, संतोष पलोड, अनिता गंधे, मानस क्षीरसागर, स्मिता कुलकर्णी, विकास कोल्हे, योगेश पाटील, समीर देवढे, डाॅ. गौरव माठा, शरद लोहकरे, राजेंद्र कराड, संदीप उगले, हरित सेनेचे संजय बिरार, शेखरभाऊ शिंदे, निलेश जगताप,दिनेश जोशी, ऋषीकेश जोशी उपस्थित होते.
0
3
2
1
2
3