
0
2
5
6
2
9
मुक्ताराम बागुल, नांदगाव…
नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या माणिकपुंज येथील शेतकरी विनायक शहादू वाघ यांचे वृक्ष लागवड अनुदान मिळणे व गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव, माणिकपुंज ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि अमोल लक्ष्मण दरेकर ग्रामरोजगार सेवक यांची चौकशी करून अनुदान रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यासाठी नांदगाव तहसील कार्यालय येथे दिनांक 3 मार्च 2025 रोजी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून. शासन व प्रशासन याकडे दखल घेते की नाही याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील शेतकरी विनायक शहादु वाघ यांनी ग्रामपंचायत मार्फत वृक्षरोपण लागवड केली होती. परंतु याचे अनुदान मजुर मस्टर माणिकपुंज ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक अमोल लक्ष्मण दरेकर यांनी संबंधित शेतकऱ्याला न विचारता त्याच्या मर्जीतील मजूराची हजेरी भरून त्याच्या नावे परस्पर अनुदान काढले आहे. चौकशी करून सदरची रक्कम मिळालवी व दोषिंवर कायदेशीर कारवाई करावी म्हणून दिनांक 3 मार्च 2025 रोजी सोमवारपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदरच्या उपोषणाच निवेदन तहसील कार्यालय नांदगाव, पंचायत समिती कार्यालय नांदगाव, पोलीस स्टेशन नांदगाव आदींना सदरचे निवेदन देण्यात आले आहे.
नांदगाव तालुक्यात सदरच्या शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीवरून नांदगाव तालुक्यात सदरची तक्रार पहिलीच आहे. आता या कष्टकरी शेतकऱ्याकडे संबंधित अधिकारी व शासन व शासन काय दाखल घेते याकडे नांदगाव तालुक्यातील संपूर्ण ग्रामस्थांचे व नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
0
2
5
6
2
9