
0
3
2
0
0
9
न्यू ब्लॉसम्स् च्या आयुष नागरेची जवाहर नवोदय मध्ये निवड
विंचूर (प्रतिनिधी) –
येथील सरस्वती एज्युकेशन संचालित न्यू ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी आयुष कांतीलाल नागरे हा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन २०२५ – २६ साठी पात्र ठरला आहे. आयुषला विषय शिक्षिका नेहा पुंड इंग्रजी, सुमित्रा व्यास गणित, संगीता जगताप बुद्धिमत्ता, जयश्री नेवगे मराठी यांचे मार्गदर्शन लाभले. आयुष व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय दरेकर सर, सचिव अविनाश दुसाने विद्यालयाच्या प्राचार्या ज्योती माठा, पूजा निकम, समन्वयक माधवी सहाय आदींसह सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
0
3
2
0
0
9