ब्रेकिंग
आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ३ कोटी २० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
0
4
2
9
5
7
येवला मतदारसंघातील विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – आमदार पंकज भुजबळ
येवला,निफाड,लासलगाव,दि.१२ नोव्हेंबर :- मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहे. नागरिकांना दिलेला शब्द कधीही पडू न देता सर्व कामे करण्यासाठी त्यांचे प्राधान्य आहे. रस्ते,पूल,तलाठी कार्यालय,सभामंडप यासह विविध कामे सुरू आहे. यापुढील काळातही राहिलेली कामे मार्गी लावली जातील. आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, शिवाजी सुपनर, डॉ.श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, बाळासाहेब पुंड, दत्तूपंत डुकरे, दत्तात्रय रायते, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच रामनाथ शेजवळ, तुकाराम जाधव, सीमा दरेकर, अशोक नागरे, दीपक सोनवणे, बालेश जाधव, गुणवंत होळकर, संतोष पलोड, अजय ब्रह्मेचा, विलास गोरे, सचिन दरेकर, बबन शिंदे, अनिल सोनवणे, मधुकर गायकर, योगेश पाटील, मंगेश गवळी,केशव जाधव, अफजल शेख, डॉ. विकास चांदर, राजेंद्र जाधव, राजेंद्र चाफेकर, सोहेल मोमिन, इस्माईल मोमिन, सागर निकाळे, माधव जगताप, राहुल डुंबरे, तुकाराम गांगुर्डे, संतोष राजोळे, बापू लचके,मोहित बकरे, मोहन शेलार, विनायक चौधरी, अनिल रहाणे, मोहन जावळे, मोहसीन शेख, अरविंद टापसे, सुनील डचके, बाळासाहेब टापसे, अशोक क्षीरसागर,लतिफ तांबोळी, गंगाराम घोडे, परसराम घोडे, विठ्ठल खुटे,हिरामण घोडे, ओम राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात दर्जेदार विकासकामे करण्यास प्राधान्य आहे. त्यामुळे नव्याने जी कामे सुरू करण्यात आली आहे. ती दर्जेदार स्वरूपात व्हावी. यामध्ये स्थानिक नागरिकांनी देखील या कामाकडे विशेष लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावीत. विकासाची प्रक्रिया ही न संपणारी प्रक्रिया आहे. नागरिकांकडून विविध मागण्या आहे. या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते झाले या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
लासलगाव सर्व्हे नंबर ३४७ येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत श्री स्वामी समर्थ मंदिर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु. २० लाख
लासलगाव गणेशनगर येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत संविधान भवन बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.३० लाख
लासलगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम राधा नगर महिला जिम व सभामंडप भूमिपूजन करणे – र.रु.३० लाख
लासलगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शिंपी गल्ली येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर परिसर सुधारणा व सुशोभिकरण करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लाख
पिंपळगाव नजीक येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत खंडेराव मंदिराजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख
पिंपळगाव नजीक येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२५ लाख
वनसगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत बुद्धविहाराजवळ पेव्हर ब्लॉक व कामे करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१० लाख
वनसगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत संत रोहिदास नगर मध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१३ लाख
वनसगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत संत रोहिदास नगर मध्ये सभामंडप बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१२ लाख
विंचुर येथे अल्पसंख्यांक निधी अंतर्गत निफाड रोड इदगाह करीता संरक्षणभिंत आणि ओटा बांधकाम व अनुषंगिक कामे करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख
विंचूर येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत वडार समाजासाठी ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेवर सभामंडप बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख
विंचूर येथे पाताळेश्वर मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे लोकार्पण – र.रु.२० लाख
सुभाषनगर येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत खंडेराव महाराज मंदिरा जवळ ग्रामपंचायतीच्या मोकळया जागेवर सभामंडप बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख
धारणगाव वीर येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सावता महाराज मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु. ३० लाख
गोंदेगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत महादेव मंदिरा जवळ सभामंडप बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लाख
भरवस येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत महानुभव मंदिराजवळ सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख
0
4
2
9
5
7


