विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू
विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू
विंचूर दि.८(प्रतिनिधी) शेतात पिकास पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की विठ्ठलवाडी (विंचूर) येथील शेतकरी अरुण भावराव गायकवाड वय ५५ वर्षे हे दि. ६ ऑक्टो.रोजी आपल्या शेतातील पिकास पाणी भरण्यासाठी गेले होते. मात्र रात्री घरी परतलेच नाही.व दुसऱ्या दिवशी दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अरुण गायकवाड यांचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदर घटनेची माहिती वामन तान्हाजी गायकवाड यांनी विंचूर पोलीस चौकीत दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. पैठणकर हे करीत आहेत.