एसटी कर्मचारी कृती समितीतर्फे भर पावसात निदर्शने
नाशिक : किरण घायदार
एसटी कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाऱ्यांएवढे होण्यासोबतच काही प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचारी कृती
समितीतर्फे काल राज्यभर निदर्शने व द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. पेठरोड येथील विभागीय कार्यशाळा येथे काल भर पावसात एस टी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती.
महामंडळातील कामगारांचा वेतन प्रश्न निकाली काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. समितीला आठवडाभरात अहवाल सादर करणे बंधनकारक होते. तद्नंतर २० ऑगस्टला मुख्यमंत्री पुन्हा कृती
समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अंतिम निर्णय देणार होते; परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली. यामुळेच प्रत्येक डेपोमध्ये निदर्शने आणि द्वारसभा घेण्याचा निर्णय घेऊन पुढील दिशा ठरवण्यात आली.
महाराष्ट्र एस. टी. कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर द्वार सभा घेण्याचे आयोजन केले होते.
एस. टी. कामगारांचे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढे होण्यासाठी राज्यातील बहुतांश संघटनांनी कृती समिती स्थापन करून ३ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार प्रलंबित व आर्थिक प्रश्नावर आंदोलनाची सरकारने दखल घेऊन कामगारांच्या मागणीप्रमाणे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून लवकरात लवकर एसटी कामगारांना न्याय द्यावा, असे कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले.
एस.टी. विभागीय कार्यशाळा,नाशिक येथील द्वारसभेला कृती समितीतील पदाधिकारी सुनील जाधव, .प्रशांत सोनवणे, राजेंद्र पालखेडकर, विलास जाधव, मानाजी सुर्यवंशी,. किरण घायदार, हरिश्चंद्र ठाकरे, किशोर टोचे, प्रमोद सावळे,प्रकाश मोरे,एकनाथ देवरे, श्याम बदादे, साहेबराव देवरे, भाऊसाहेब निकम, विजय चव्हाण, प्रसाद आहेर, सौ. कल्पना चौरे, रत्नप्रभा वाडेकर, सुरेखा जाधव व इतर सभासदांच्या उपस्थितीमध्ये द्वारसभा झाली.
????
किरण घायदार
9370081612…