उपजिल्हा रुग्णालय निफाड अंतर्गत बेटी बचाव अभियानकरीता विविध स्पर्धा
Asif Pathan…
उपजिल्हा रुग्णालय निफाड अंतर्गत बेटी बचाव अभियानकरीता विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आली. जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी सर यांचे आदेशान्वये उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील कार्यरत वैद्यकिय अधिक्षक डॉ.राजीव तांभाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दिनांक 22/7/2024 ते दिनाक 31/7/24 रोजी PCPNDT कार्यक्रमाची योजना जनमानसात पोचवण्यासाठी बेटी बचाव या कार्यक्रमा अंतर्गत वैनतय ज्युनिअर कॉलेज निफाड येथे लेक वाचवा, लेक शिकवा, याविषयावर *निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली . यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रत्येक स्पेधेतून प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकूण 12 नंबर काढण्यात आले .
या कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हा रुग्णालय निफाडचे वैद्यकीय अधीक्षक व डॉ कविता कदम, दंत शल्यचिकित्सक, औषध निर्माण अधिकारी,श्री पराग चव्हाण, अधिपरीचारिका श्रीमती शिंदे, श्रीमती पेखले (कंटाळे), समुपदेशक ,श्री नितिन परदेशी तसेच प्राचार्य श्री सोनवणे सर, त्यांचे सह प्राध्यापक श्री. साळुंके व्ही.एस., श्रीम. कुलकर्णी व्ही. आर, श्रीम. भोसले एस.बी., श्री. काकड बी.एस, श्री. पंडित एस.सी. उपस्थित होते.