गुन्हेगारीसामाजिक
व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; विंचूर बंद, आरोपीस आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
0
4
2
9
5
7
विंचूर दि.६(प्रतिनिधी)
येथील व्यापारी विजयकुमार (पवन) नंदकुमार जाजू यांच्यावर भरपेठेत मनोज गोराडे या आरोपीने चाकूचा वार करून जीवे माराण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात विजयकुमार (पवन) जाजू हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ आज विंचूरकरांनी बंद पाळून निषेध नोंदवला. तसेच विंचूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी नाशिक मर्चंट बँकेचे संचालक प्रकाश दायमा, विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून आरोपीला कडक शिक्षा व्हावी.तसेच वारंवार अशा घटना घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करत निषेध नोंदवला.
दरम्यान या गुन्ह्याबद्दल मनोज गोराडे यांच्यावर लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये 225/2025 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 2023 चे कलम 109, 115 (2), 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व पोलीस हवालदार उत्तम गोसावी करीत आहेत.
दरम्यान संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
0
4
2
9
5
7


