Breaking
क्रिडा व मनोरंजन

पत्री सरकार’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील अंगावर शहारे आणणाऱ्या संवादाची चर्चा, २० नोव्हेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

0 5 2 2 6 3

पत्री सरकार’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील अंगावर शहारे आणणाऱ्या संवादाची चर्चा, २० नोव्हेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजी हुकूमत हादरवून सोडणारे आणि समांतर प्रतिसरकार उभारून रयतेचे राज्य निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक पर्वावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आणि विशेष गाण्याचा भव्य अनावरण सोहळा काल ईश्वरपूर येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम, मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंगावर काटा आणणारा ट्रेलर कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला.

‘पत्री सरकार’चा ट्रेलर अत्यंत प्रभावी, रोमांचक आणि देशभक्तीची भावना चेतवणारा ठरला आहे. “गोऱ्यांच्या कचेरीवर तिरंगा आपला लागलाच पाहिजे”, “पत्री सरकार हे जनतेचे सरकार आहे” आणि “शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने या इंग्रज सत्तेला परतून लावायचं” यांसारखे अंगावर शहारे आणणारे संवाद, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे बलिदान आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध पुकारलेला एल्गार ट्रेलरमध्ये प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणारा लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन. याप्रसंगी अंकित मोहनवर चित्रित करण्यात आलेल्या एका दमदार आणि ऊर्जावान गाण्याचे मोठ्या पडद्यावर अनावरण करण्यात आले. या गाण्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आपल्या भूमिकेबद्दल आणि गाण्याबद्दल बोलताना अंकित मोहनने, “महाराष्ट्राच्या या सुवर्ण इतिहासाचा आणि क्रांतिसिंहांच्या विचारांचा भाग होता आले याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशी भावना व्यक्त केली.

‘भागीरथी मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली असून, चित्रपटाचे सशक्त लेखन व दिग्दर्शन मनीष अनसुरकर यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या दमदार आवाजातील व्हॉईसओव्हरने चित्रपटाला एक वेगळी धार दिली आहे. चित्रपटात क्रांतिसिंह नाना पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते अनिल रबाडे यांनी साकारली असून त्यांच्यासोबत अनुराधा धामणे, सिद्धार्थ बडी, शुभम गवई, रश्मी साळवी, तृप्ती शेडगे आणि पाहुणे कलाकार अंकित मोहन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा ‘पत्री सरकार’ हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 2 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे