Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

एसटी बस मध्ये दागिन्यांची चोरी, संशयित महिलांना निफाड पोलिसांनी पकडले 

0 3 2 1 2 8

एसटी बस मध्ये दागिन्यांची चोरी, संशयित महिलांना निफाड पोलिसांनी पकडले 

 निफाड = गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी निफाड बस स्थानकावर बस मध्ये प्रवेश करून सर्व प्रवाशांची चौकशी केली असता त्यांना काही संशयित महिला आढळून आल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता त्या महिलांनी योग्य उत्तरे न दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

 याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात येवला ते अहिल्यानगर बस मध्ये प्रवास करत असताना एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरी झालेले होते. यावरून येवला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तसेच नाशिक ते संभाजीनगर बस मध्ये प्रवास करत असताना एका महिलेचे सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तेव्हापासून या प्रकरणी पोलीस तपास सुरू होता. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुप्त खबर मिळाली की या महिला बसमधून प्रवास करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी बस मध्ये प्रवाशांची चौकशी केली असता त्यांना संशयित महिला आढळून आल्या. या महिलांना ताब्यात घेतल्यानंतर चोरीची तक्रार देणाऱ्या महिलांना बोलवण्यात येऊन त्यांना संशयित महिला याच होत्या का असे शहनिशा करून त्यांचा पुरवणी जबाब घेतला. दोन्ही घटनांमध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याची नोंद येवला व सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेली होती.

 याबाबत पोलीस निरीक्षक गुरव यांनी आवाहन केले आहे की बस मध्ये काही महिला लहान बाळांना घेऊन किंवा गरोदर महिलांना सोबत घेऊन बस मध्ये प्रवेश करतात. आणि प्रवासादरम्यान प्रवासी बॅग मधून किमती वस्तू चोरून नेतात त्यामुळे प्रवाशांनी याबाबत काळजी घ्यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे