गुन्हेगारीशैक्षणिक
आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची युवकांनी काळजी घ्यावी … सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे
बिटको महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना सुरक्षा विषयक मार्गदर्शन

0
2
5
6
6
0
आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची काळजी युवकांनी घ्यावी … सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे
बिटको महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना सुरक्षा विषयक मार्गदर्शन….
नाशिकरोड : ” आर्मी, पोलीस भरती व पोलीस अधिकारी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच आवश्यक कौशल्य, सातत्याने वाचन, बॉडी बिल्डिंग, कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. आवडते छंद जोपासा, सामान्य ज्ञान वाढवा. कुठल्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका, चांगल्या मित्रांशी मैत्री करा. वाहन चालवताना योग्य वेगातच चालवा, आपले स्वतःची काळजी घेताना हेल्मेटचा वापर नक्की करा. अनेक गुन्ह्यांमध्ये युवकांचा सहभाग दिसतो. सायबर गुन्ह्यामध्ये फसू नका, अनोळखी लिंक वर क्लिक करू नका. आलेला ओटीपी शेअर करू नका. मुलींनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना काळजी घ्यावी. छेडछाडी व रात्री एकटं असताना कोणी त्रास देत असल्यास निर्भया पथकाची अवश्य मदत घ्या. कुठे गुन्हा घडत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला ११२ क्रमांकावर संपर्क करा. अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, टेक्नॉलॉजीचा वापर योग्य सत्कारात्मक कामासाठीच उपयोग करा , ” असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आयोजित ‘ कायदा सुव्यवस्था व वाढती गुन्हेगारी ‘ पार्श्वभूमीवर आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, पोलीस अंमलदार नामदेव पेंढारे, प्रा. सोनाली राऊत, प्रा. ज्योती पेखळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी , ” महाविद्यालयात सुरक्षा व शिस्तपालनासाठी उपनगर व बिटको पोलीस स्टेशनचे नेहमी सहकार्य मिळत असते. एमपीएससी परीक्षा पास होणे सहज सोपी गोष्ट नाही त्यासाठी कठोर परिश्रम व पोलीस अधिकाऱ्यांचे मनोगत अनुभव करिअर साठी मनोबल वाढवण्यासाठी उपयुक्त झाल्याचे अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यशस्वी होण्यासाठी चांगले ध्येय ठरवा, चांगला विद्यार्थी व उत्तम नागरिक कसे होता येईल याचा ध्यास घ्या, ” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुरभी आहेर यांनी केले तर आभार प्रा. प्रणाली पंडित यांनी मानले.
-
Sanjay Paramsagar
0
2
5
6
6
0