आंदोलनगुन्हेगारीसामाजिक
नांदगाव येथील साळवे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला,
अत्याचार विरोधी कृती समितीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना निवेदन

0
3
2
1
2
3
नांदगाव येथील साळवे कुटुंबीयांवर प्राण घातक हल्ला,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना
अत्याचार विरोधी कृती समितीचे निवेदन
✍️ मुक्ताराम बागुल…
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील साळवे कुटुंबीयांवर प्राण घातक हल्ला झाला असून याबाबत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 105/2025 दिनांक 10 मार्च 2025 मधील गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा व इतर न्याय मागण्यांचे निवेदन अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती AVKS च्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण चे मिरखेलकर साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाची मा. मिरखेलकर साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी तात्काळ दखल घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी नांदगाव तालुका तसेच स्थानिक पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेशित केले आहे.
यावेळी अत्याचार विरोधी कृती समिती AVKS चे मुख्य निमंत्रक एडवोकेट राहुल विष्णू तुपलोंढे, रोहिणीताई जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर संचालिका नाशिक, पिडीतेची आई सीमाताई निकाळे, सामाजिक कार्यकर्ती वंदनाताई उन्हवणे, रोहित साळवे, किशोर चोपडे, आधी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
0
3
2
1
2
3