Breaking
ब्रेकिंगशैक्षणिक

विंचूरमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

0 4 2 9 5 7

विंचूरमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शैक्षणिक व सामाजिक कार्याचा पाठपुरावा करण्याचा संदेश

विंचूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाची स्मृती जपत, भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात गावकरी, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या कार्यक्रमादरम्यान फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदिश जेऊघाले,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ व रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य सुनिल मालपाणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पंढरीनाथ दरेकर,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम यांसह इतर मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या गीत मंचाने रयत गीत सादर केले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल, ताशा, नृत्य, पथनाट्य, झांज पथक यासह विविध सादरीकरणे केली. समाजसुधारक, जलव्यवस्थापन, गणितीय संशोधन, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा,क्रांतिकारक, सर्वधर्मसमभाव, स्त्री-पुरुष समानता, संत, स्वच्छता अभियान, वारकरी, साईबाबा, दांडी यात्रा, वृक्षदिंडी, भजनी मंडळ, सैनिकी देखावा, तंबाखूमुक्ती, साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव, जागरण-गोंधळ या विषयांवर आधारित देखावे सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.

तसेच, विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, पावरी नृत्य, टिपरी नृत्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची मावळे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मिरवणुकीनंतर विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टर रथ उपलब्ध करून देणाऱ्या पालकांचे विद्यालयाच्या वतीने प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदाम माळी, लाइफ मेंबर राजेंद्र चांदे, प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विनायक जेऊघाले, राजाराम दरेकर, दिनकर चव्हाण, ज्ञानेश्वर गाडे, पी.के. जेऊघाले, ढवण सर, सोनाली कापडणीस, सोमनाथ दरेकर, राजेंद्र क्षीरसागर, कडू पाटील, सति श शेलार, मुकुंद आभाळे, रवींद्र सानप, महेश जोशी, मधुकर दरेकर, महेंद्र मस्कर, भूषण चव्हाण, संजू जोशी, सुमनताई दरेकर, भागवत जाधव, विजय शेवाळे, युवराज दरेकर, स्वाती धात्रक, मीरा दरेकर, स्नेहल साळी, आरती जाधव, वर्षा वाघ, मालती जाधव, बागुल सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे