ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
टीचर्ज व्हिस्कीचे सशक्त नवसंवर्धित रूपाचे अनावरण
0
4
2
9
5
7
टीचर्ज व्हिस्कीचे सशक्त नवसंवर्धित रूपाचे अनावरण
टीचर्ज व्हिस्कीच्या नव्या युगाची सुरुवात: परंपरेचा सन्मान करत आधुनिकतेची जोड
नाशिक, १९ जुलै २०२५ : जगातील एक अत्यंत प्रतिष्ठित स्कॉच व्हिस्की ब्रँड, टीचर्ज व्हिस्की याने महाराष्ट्रात आपली नव्याने संवर्धित ओळख सादर केली आहे. हे नवस्वरूप आधुनिकतेने परिपूर्ण असूनही कालातीत परंपरेशी निष्ठावान आहे. १९५ वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा, अचल श्रद्धा आणि उत्कृष्ट गुणवत्तेचा उत्सव साजरा करत आहे.
हे केवळ नविन स्वरूप नसून, पिढ्यानपिढ्या टीचर्ज ची ओळख ठरलेली पारंपरिक चव जपण्याची नव्याने घेतलेली बांधिलकी आहे. संस्थापक विल्यम टीचर यांच्या दूरदृष्टीनुसार, हे मिश्रण त्याच्या खास गुळगुळीतपणासाठी आणि उच्च माल्ट प्रमाण व खास स्मोकी चवसाठी ओळखले जाते. १९० वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलेली ही सातत्यपूर्ण गुणवत्ता जगभरातील व्हिस्की प्रेमींना आपली वाटते.
ही नवी ओळख आजच्या प्रीमियम व्हिस्की ग्राहकांसाठी साकारलेली आहे – आत्मविश्वासू, जागतिक पातळीवर सजग आणि गुणवत्तेचे कौतुक करणारा. लंडनस्थित प्रसिद्ध ब्रँड डिझाईन संस्था डिझाईन ब्रिज अॅण्ड पार्टनर्स यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही सुधारणा केवळ लेबलपुरती मर्यादित नसून, बाटलीच्या रचनेमध्येही उन्नती साधून ती खोल, आशयघन आणि वेगळेपण दर्शवते. या नव्या रूपाचे केंद्रबिंदू म्हणजे ‘ डब्ल्यूटी हे चिन्ह, जे संस्थापक विल्यम टीचर यांच्या प्रामाणिकतेचा आणि ठामतेचा गौरव करते.
सजवलेली रचना, समृद्ध रंगछटा आणि आधुनिक शैली एकत्र येऊन टीचर्ज ची आकर्षक वैयक्तिकता आणि आत्मविश्वास पुन्हा अधोरेखित करतात.
सनटोरी ग्लोबल स्पिरिट्सचे वरिष्ठ विपणन संचालक ऋषी वल्ली म्हणाले की या सशक्त नव्या पॅकेजिंगमुळे आपण केवळ टीचर्ज च्या स्वरूपात नवचैतन्य आणत नाही, तर जवळपास दोन शतकांची मूल्ये पुन्हा अधोरेखित करत आहोत. ही सुधारणा आमच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत असतानाच आजच्या संस्कृती-सजग ग्राहकांसोबत जुळणारी आधुनिक छटा घेऊन येते. काळानुरूप विकसित होण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे प्रतीक आहे, ज्यात आमचा दर्जा आणि चारित्र्य यांचा आत्मा कायम राखला आहे.
जास्त प्रमाणात वापरलेला माल्ट, एक्स-बोर्बन पिंपांमध्ये केलेली काटेकोर परिपक्वता आणि आर्डमोरच्या विशिष्ट सिग्नेचर मॉल्टची असलेली सातत्यपूर्ण उपस्थिती – या सर्व घटकांमुळे टीचर्ज च्या प्रत्येक बाटलीत काटेकोरपणा, चिकाटी आणि ‘उत्तमतेवर विश्वास’ ही परंपरा जिवंत राहते.
0
4
2
9
5
7



